ETV Bharat / state

एकाच घरावर दोन झेंडे? वडील राष्ट्रवादीत, तर मुलगा व सून सेनेत; कार्यकर्ते म्हणतायेत कोणता झेंडा घेऊ हाती?

सुरेश देशमुख हे राष्ट्रवादीत असल्याने आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याचे विभाजन होईल. यात समीर देशमुख यांनी हातात भगवा घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये भगवा की राष्ट्रवादीचा झेंडा घेऊ हा प्रश पडल्याशिवाय राहणार नाही.

author img

By

Published : Sep 11, 2019, 8:34 AM IST

समीर देशमुख शिवसेनेत

वर्धा - एकेकाळी सहकार गटावर वर्ध्यातील देशमुख कुटुंबीयांची एकहाती सत्ता होती. मध्यंतरीच्या काळात सहकार क्षेत्रावरील त्यांची हळूहळू पकड सुटत गेली. यातूनच सुरेश देशमुख यांचे पुत्र समीर देशमुख यांनी राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सहकार सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न केला. मागील काळात सत्ता असतानाही काहीच साध्य न झाल्याने आज समीर देशमुख यांनी राष्ट्रवादीला राम-राम करत सेनेत प्रवेश केला. घड्याळ सोडून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भगवा स्वीकारला. खासदारकी लढण्याची इच्छा अर्धवट राहिल्यानंतर आता आमदारकीचे तिकीट मिळावे, यासाठी सेनेचे शिवबंधन बांधले.

समीर देशमुख शिवसेनेत

सुरेश देशमुख हे माजी आमदार असून पवार घराण्याशी त्यांची जवळीक राहिली आहे. कालांतराने सहकार क्षेत्रातील पकड सुटणे, मध्यवर्ती बँक डबघाईस येणे, यांसह अनेक कारणाने देशमुख कुटुंब सामान्य जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यास कमी ठरला. दरम्यान, 2009 मध्ये सुरेश देशमुख यांनी अपक्ष निवडून येत आमदारकी मिळवली. मात्र, पुढे बँकेचे डबघाईस येणे भोवले आणि 2014 मध्ये ते पराभूत झाले. या कालावधीत जिल्ह्यासह याही विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रस्थ वाढत असताना राष्ट्रवादी खिळखिळी झाली. यात समीर देशमुख हे राजकीयदृष्ट्या महत्वकांक्षी असल्याने पुढे येण्याचे प्रयत्न केले. ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदी राहिले. पण निवडणूक लढवली नाही. यंदाही समीर देशमुख यांनी खासदारकी मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यांचे वडील सुरेश देशमुख यांचे भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्याशी जवळीक राहिली आहे. यामुळे तिकडे जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण तिकीट पदरात पाडण्यात यश आले नाही.

हेही वाचा - देशाच्या आर्थिक परिस्थितीला लपविण्यासाठी जादूटोण्याचा विषय - नाना पटोले

वर्ध्यात 2014 मध्ये पंकज भोयर यांनी सुरेश देशमुख यांचा पराभव केला. यानंतर बँक डबघाईस आल्याने प्रकरणाची चौकशी सुद्धा लावण्याची मागणी केली. तेव्हापासून देशमुख कुटुंब स्वतःला वाचवण्यासाठी भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली. पण भाजपकडून त्यांना हाऊसफुलचा बोर्ड दाखवण्यात आल्याचे बोलले जाते. यात मागील काही दिवसांपासून समीर देशमुख यांनी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री तथा आमदार रणजित कांबळे यांच्या विरोधात काम सुरू केले. समीर देशमुखांचा वर्धा शहरातून मुक्काम हलवत देवळी मतदारसंघात पोहोचला. यात ही जागा शिवसेनेला सुटणार असल्याच्या चर्चेतून राजकीय खेळीला सुरुवात झाली. यामुळे आमदारकीसाठी सेनेकडून तिकीट मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. यातूनच हा प्रवेश झालाय असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - ही जनआशीर्वाद यात्रा माझ्यासाठी तीर्थयात्रा - आदित्य ठाकरे

देवळी मतदारसंघात याच जागेवर शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे हे हिंगणघाट मतदारसंघातून भाजपचे समीर कुणावर विजयी झाल्याने मागणी करण्याची शक्यता आहे. यासह अनेक वर्षांपासून शिवसेनेत असलेले बाळू उर्फ प्रशांत शाहगडकर, तसेच रिएंट्री झालेले रविकांत बालपांडे यांचेही नाव समोर येत आहे. यामुळे सेनेच्या निष्ठावंतांना डावलले जाईल का, तसेच भाजप अनेकदा पराभूत झाल्याने ही जागा सोडेल काय? की निष्ठावंतांना तिकीट मिळाल्यास समीर देशमुख हे त्यांची कांबळे विरोधक ओळख कायम ठेवत पक्षासाठी काम करतील का? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे युतीतील जागा वाटपानंतर, उमेदवार घोषित झाल्यानंतर मिळेल आणि त्यानंतर विधानसभेचे चित्र स्पष्ट होईल.

हेही वाचा - वर्ध्यात तलावाच्या भिंतीला भेगा; गावकऱ्यांनी भीतीने सोडले गाव

कोणता झेंडा घेऊ हाती?

Intro:mh_war_01_samirdeshmukh_sena_pravesh_pkg_7204321

एकाच घरावर दोन झेंडे ?
वडील राष्ट्रवादीत तर मुलगा आणि सून सेनेत

वर्धा - एकेकाळी सहकार गटावर वर्ध्यातील देशमुख कुटूंबीयांची एकहाती सत्ता होती. मध्यंतरीच्या काळात सहकार क्षेत्रावरील त्यांची हळूहळू पकड सुटत गेली. यातूनच सुरेश देशमुख यांचे पुत्र समीर देशमुख यांनी राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सहकार सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न केला. मागील काळात सत्ता असतानाही काहीच साध्य न झाल्याने आज समीर देशमुख यांनी राष्ट्रवादीला राम-राम करत सेनेत प्रवेश केला. घड्याळ सोडून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भगवा स्वीकारला. खासदारकी लढण्याची इच्छा अर्धवट राहिल्यानंतर आता आमदारकीची तिकीट मिळावी, यासाठी सेनेचे शिवबंधन बांधले.

सुरेश देशमुख हे माजी आमदार असून पवार घराण्याशी त्यांची जवळीक राहिली आहे. कालांतराने सहकार क्षेत्रातील पकड सुटणे, मध्यवर्ती बँक डबघाईस येणे, यासह अनेक कारणाने देशमुख परिवार सामान्य जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यास कमी ठरला. दरम्यान, 2009 मध्ये सुरेश देशमुख यांनी अपक्ष निवडून येत आमदारकी मिळवली. मात्र पुढं बँकेचे डबघाईस येणे भोवले आणि 2014 मध्ये ते पराभूत झाले. या कालावधीत जिल्ह्यासह याही विधानसभा मतदारसंघात भाजपच प्रस्थ वाढत असताना राष्ट्रवादी खिळखिळी झाली. यात समीर देशमुख हे राजकीयदृष्ट्या महत्वकांक्षी असल्याने पुढे येण्याचे प्रयत्न केले. ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदी राहिले. पण निवडणूक लढवली नाही. यंदाही समीर देशमुख यांनी खासदारकी मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यांचे वडिल सुरेश देशमुख यांचे भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्याशी जवळीक राहिली आहे. यामुळे तिकडे जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण तिकीट पदरात पाडण्यात यश आले नाही.

वर्ध्यात 2014 मध्ये पंकज भोयर यांनी सुरेश देशमुख यांचा पराभव केला. यानंतर बँक डबघाईस आल्याने प्रकणाची चौकशी सुद्धा लावण्याची मागणी केली. तेव्हापासून देशमुख परिवार स्वतःला वाचवण्यासाठी भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली. पण भाजपकडून त्यांना हाऊसफुलचा बोर्ड दाखवण्यात आल्याचे बोलले जाते.

यात मागील काहीं दिवसांपासून समीर देशमुख यांनी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री तथा आमदार रणजित कांबळे यांच्या विरोधात काम सुरू केले. समीर देशमुखांचा वर्धा शहरातून मुक्काम हलवत देवळी मतदारसंघात पोहचला. यात ही जागा शिवसेनेला सुटणार असल्याच्या चर्चेतून राजकीय खेळीला सुरवात झाली. यामुळे आमदारकीसाठी सेनेकडून तिकीट मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. यातूनच हा प्रवेश झालाय असल्याचे बोलले जात आहे.

देवळी मतदारसंघात याच जागेवर शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे हे हिंगणघाट मतदारसंघातून भाजपचे समीर कुणावर विजयी झाल्याने मागणी करण्याची शक्यता आहे. यासह अनेक वर्षांपासून शिवसेनेत असलेले बाळू उर्फ प्रशांत शाहगडकर, तसेच रिएंट्री झालेले रविकांत बालपांडे यांचेही नाव समोर येत आहे. यामुळे सेनेच्या निष्ठावंतांना डावलले जातील का, तसेच भाजप अनेकदा पराभूत झाल्याने ही जागा सोडेल काय?. की निष्ठावंतांना तिकीट मिळाल्यास समीर देशमुख हे त्यांची कांबळे विरोधक ओळख कायम ठेवत पक्षासाठी काम करेल का, असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेय. शा अनेक प्रश्नांची उत्तरं युतीतील जागा वाटप नंतर, उमेदवार घोषित झाल्यानंतर मिळेल आणि त्यांनतर विधानसभेचे चित्र स्पष्ट होईल.

कोणता झेंडा घेऊ हाती....कार्यकर्त्यांना प्रश्न

सुरेश देशमुख हे राष्ट्रवादीत असल्याने आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याचे विभाजन होईल. यात समिर देशमुख यांनी हातात भगवा घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये भगवा की राष्ट्रवादीचा झेंडा घेऊ हा प्रश पडल्याशिवाय राहणार नाही.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.