ETV Bharat / state

सरकारी दरात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेल, गोर गरिबांचे वाचेल प्राण - नितीन गडकरी

केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमतीनुसार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेल, शिवाय काळाबाजारीला आळा बसणार असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ते आज वर्ध्याच्या दौऱ्यावर असताना बोलत होते. गडकरी यांनी आज जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडला भेट दिली.

Nitin Gadkari visit Genetic Life Sciences
जेनेटिक लाईफ सायन्सेस रेमडेसिवीर निर्मिती
author img

By

Published : May 6, 2021, 11:00 PM IST

वर्धा - केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमतीनुसार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेल, शिवाय काळाबाजारीला आळा बसणार असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ते आज वर्ध्याच्या दौऱ्यावर असताना बोलत होते. गडकरी यांनी आज जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडला भेट दिली. त्यांच्या प्रयत्नांने रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाले असून त्यांनी प्लांटची पाहणी करत आढावा घेतला.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी आणि नितीन गडकरी

हेही वाचा - वर्ध्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवस कडक निर्बंध

वर्ध्याच्या एमआयडीसी येथील जेनेटिक लाईफ सायन्स प्रा.ली. मध्ये रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. ही आनंदाची बातमी संपूर्ण विदर्भाच्या जनतेसाठी आहे. अनेक रुग्ण या औषधीकरिता भटकंती करत असताना तुटवडा भासत आहे. या औषधीची निर्मिती सुरू झाली असून 30 हजार व्हायल्स दिवसाला तयार होणार आहे. औषधीचे वितरण जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात होणार आहे. नागपूर जिल्हा आणि विदर्भाला औषध वितरणात प्राधान्य मिळणार असून महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील पुरवठा होणार आहे.

Nitin Gadkari visit Genetic Life Sciences
जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीची पाहणी करताना मंत्री नितीन गडकरी

गोर गरीबांना सरकारी दरात मिळेल रेमडेसिवीर

यात वर्ध्याला वाटपात प्राथमिकता असणार आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमतीनुसार हे इंजेक्शन आता उपलब्ध होणार असून आता याची ब्लॅक मार्केटिंग होणार नाही. गोरगरीब लोकांच्या प्राणाचे रक्षण होईल. जेनेटिक कंपनीसाठी रेमडेसिवीर निर्मितीचा परवाना मिळवणे कठीण काम होत, यावर एक पुस्तक लिहिता येईल, असे मिश्किलीने गडकरी म्हणाले. पण, यशस्वी झाले असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. जेनेटक कंपनी ही देशातील पहिली कंपनी आहे जिला इतक्या कमी कालावधीत परवानगी मिळाली, असेही गडकरी म्हणाले.

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन काम करायचे आहे

भिलाईवरून ऑक्सिजन आणण्यात येणार आहे. सेवाग्राम, सावंगी रुग्णालयाला 20 टन ऑक्सिजन मिळणार आहे. व्हेंटिलेटर द्यायला तयार आहे, त्याचा उपयोग झाला पाहिजे. सर्वांनी हिमतीने कोरोनाचा प्रतिकार केला पाहिजे. परिस्थिती आव्हानात्मक आहे. हे संकट मोठे आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ती लक्षात घेता या अडचणी लक्षात घेऊनच तयारी असायला पाहिजे.

कोणाचा जीव जाता कामा नये

एकाचाही ऑक्सिजनविना, औषधीविना मृत्यू होता कामा नये याची दखल घेण्यासाठी सगळे जण प्रयत्न करत आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, मास्क लावावा, सॅनिटायजर वापरावे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

हेही वाचा - 'या' गावात कोणालाही प्रवेश नाही! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.