वर्धा - पुढील २ दिवस जिल्ह्याचे तापमान वाढणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे रेड अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.
जिल्ह्यात सातत्याने उकाडा वाढतच चालला आहे. गेल्या ८ दिवसांपासून उष्ण लहरींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या २ दिवसांपासून तापमान ४६.५ डिग्री सेल्सिअसवर स्थिरावले आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी महिला, विद्यार्थिनी स्कार्फ बांधून स्वतःची सुरक्षा करीत आहेत. थोडासा थंडावा मिळावा यासाठी झाडांचा आश्रय घेताना दिसत आहे. अचानक वाढलेल्या उन्हामुळे शहरातील मुख्य रस्ते ओस पडायला लागली आहेत.