वर्धा - अर्थव्यवस्था चालविण्यासाठी गरिबांच्या हातात पैसे द्यावे लागतील. मजूर, युवकांच्या हातात पैसे असल्याशिवाय अर्थव्यवस्था चालू शकत नाही, रोजगार निर्माण होऊ शकत नाही, रोज शेतकरी आत्महत्या करत आहे. भाजपचे टीशर्ट घातलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केला.
ते वर्ध्यातील जिल्हा परिषदेचा कन्या शाळेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
नरेंद्र मोदी मतदारांचे लक्ष विचलीत करतात. कधी देशाच्या बाहेर, कधी 370 वर, कधी चीनच्या राष्ट्रपतीकडे, कधी काश्मीरकडे नेतात. पण, ज्या तुमच्यापुढे समस्या आहेत. त्यावर कधीच बोलत नाहीत. बेरोजगारीवर बोलत नाही. शेतकरी आत्महत्येवर कधी बोलत नाही.
हेही वाचा - 'विदर्भ एक्स्प्रेस'समोर उडी घेऊन तरुणीची आत्महत्या
जीएसटीचा फायदा अदानी, अंबानींना मिळतो, जीएसटीचे लक्ष्य छोट्या दुकानदारांना मारण्याचे आहे. प्रत्येक महिन्याला अर्ज भरावा लागतो. त्यामुळे कधी-कधी लाचही द्यावी लागत असल्याचे सांगितले जात. सगळे उद्योग उद्ध्वस्त होत असल्याचे म्हणाले. जीएसटी म्हणजेच गब्बरसिंग टॅक्स, लागू केला. आज गुजरात महाराष्ट्र, कर्नाटक, एका मागे एक देशातील छोटे व्यपारी सर्व संपले असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
हेही वाचा - आता फक्त प्रत्येकाला चंद्रावर एक-एक प्लॉट देणे बाकी आहे; फडणवीसांची आघाडीवर टीका
आर्वी येथील जाहीर प्रचार सभेत मंचावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, आमदार अमर काळे, वर्धा मतदार संघाचे उमेदवार शेखर शेंडे हे मंचावर होते.
हेही वाचा - 'वर्धा ते नागपूर अंतर ३५ मिनिटांत होणार पार, धावणार ब्रॉडगेज मेट्रो'