वर्धा - केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना प्रविण तोगडिया यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. बजेटमध्ये शेती, बेरोजगारीची चिंता नाही. देशात सध्या गरिबांना आवश्यक असणाऱ्या वस्तु महाग होत आहेत. मात्र, टीव्हीसारख्या वस्तु स्वस्त होत आहेत. अशी अवस्था असणाऱ्या देशाचे पुढे काय होणार, हा खरा प्रश्न असल्याचे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणवरून उच्च शिक्षणमंत्र्यांनी कुलगुरुंना झापले !
वर्ध्यात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलच्या धर्मरक्षा निधी व पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना तोगडिया यांनी ही टीका केली. देशात बेरोजगारी, शेतमालाचे भाव या सर्वांत मोठ्या समस्या आहेत. पण अर्थसंकल्पात त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. जिवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. जगायला लागणाऱ्या वस्तू महाग होत असता दुसरीकडे टीव्ही मात्र स्वस्त होत आहे, असे सांगत तोगडिया यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.
हेही वाचा... "शरद पवार अजूनही तरुण आहेत, २०२४ ला पंतप्रधान होऊ शकतात"
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात दोन कोटी रोजगार वाढवण्याचे वचन दिले होते. पण रोजगार न वाढवता सहा कोटी रोजगार कमी झाले. देशात बेरोजगारी आणि शेतमालाचे भाव यांची गंभीर समस्या आहे. पण बजेटमध्ये शेतमालाचे भाव आणि बेरोजगारी यावर चिंता व्यक्त केली नाही, अशी टीका तोगडिया यांनी केली.