ETV Bharat / state

पोलीस व्हॅन बनली 'सॅनिटायझर व्हॅन'; वर्ध्याच्या पोलिसांचं देसी जुगाड - वर्धा पोलीस

सॅनिटायझर युनिट बनवताना अगदी सहज आणि स्वतःतात बनवण्यात आले आहे. यासाठी देसी जुगाड म्हणजेच शेतात सिंचनासाठी वापरले जाणारे पाईप आणि सॅनिटायझर फवारणीसाठी नोजल उपयोगात आणले आहे.

sanitizer van in wardha
पोलीस व्हॅन बनली 'सॅनिटायझर व्हॅन'; वर्ध्याच्या पोलिसांचं देसी जुगाड
author img

By

Published : Apr 10, 2020, 5:51 PM IST

Updated : Apr 10, 2020, 7:41 PM IST

वर्धा - कोरोनाच्या लढ्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आपल्या जिवाची बाजी लावून लढत आहेत. दिवसभर सेवा देणारे पोलीस कर्मचारी अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेकरीत पोलीस व्हॅनमध्येच सिंचन साहित्याचा उपयोग करून निर्जंतुकीकरण करण्यासाठी अवघ्या साडे आठ हजारात हा जुगाड तयार करण्यात आला आहे. पोलीस विभागाच्या मोटर वाहन विभागाने केलेला हा जुगाड सध्या पोलिसांना संरक्षण करत आहे.

सर्वत्र सेवा देताना प्रत्यक्ष लोकांशी संपर्क येते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा. कोणालाही बाधा होऊ नये. याशिवाय कर्तव्य बजावताना संरक्षण व्हावे म्हणून, सकाळी आणि सायंकाळी या सॅनिटायझर व्हॅनच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करून त्यांना सुरक्षा कवच प्रदान केले जात आहे.

पोलीस व्हॅन बनली 'सॅनिटायझर व्हॅन'; वर्ध्याच्या पोलिसांचं देसी जुगाड
sanitizer van in wardha
पोलीस व्हॅन बनली 'सॅनिटायझर व्हॅन'; वर्ध्याच्या पोलिसांचं देसी जुगाड
हे सॅनिटायझर युनिट बनवताना अगदी सहज आणि स्वस्तात बनवण्यात आले आहे. यासाठी देसी जुगाड म्हणजेच शेतात सिंचनासाठी वापरले जाणारे पाईप आणि सॅनिटायझर फवारणीसाठी नोजल उपयोगात आणले आहे. यासोबत एक साधा ड्रम, 12 आणि 14 व्होल्टची डिसी मोटर वापरण्यात आली आहे. यामुळे मोटार बसवण्यात आली आहे. ती व्हॅनच्या बॅटरीवर चालत असल्याने विद्युतपुरवठ्याची गरज नाही. यामुळे अवघ्या साडे आठ हजारात हे युनिट बनवण्यात आले आहे. व्हॅनमध्ये कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी पोलीस परिवहन विभागाने बनवले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश मुंडे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.सुरुवातीला चौकांमध्ये असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना यामध्ये हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यांनंतर तोंडाला मास्क लावून आणि डोळे बंद ठेवून साधारण सहा सेकंदात व्हॅनमध्ये फिरून परत यायचे आहे. पोलीस स्टेशन आणि इतर भागात जाऊन व्हॅनच्या माध्यमातून सेवा दिली जाणार आहे.

Last Updated : Apr 10, 2020, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.