ETV Bharat / state

ट्रकचालकाची हत्या करणाऱ्या चोरास वर्ध्यातून अटक - truck driver

चोरट्याने ट्रकच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून पैसे शोधण्यास सुरूवात केली. त्यावेळी अचानक रमेशकुमार यांना जाग आली. त्यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने रमेशच्या छातीवर, पोटावर आणि हातावर चाकूचे घाव घातले

ट्रकचालकाची हत्या करणाऱ्या चोरास वर्ध्यातून अटक
author img

By

Published : Apr 15, 2019, 12:57 PM IST

वर्धा - वर्धा ते हिंगणघाट मार्गावर धोत्रा चौरस्ता येथील शिवार ढाब्यासमोर रात्री ट्रकचालकाची चोरट्याने धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याला हत्येच्या गुन्ह्यात १० तासाच्या आत अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. रमेशकुमार नरसिंग यादव (वय ३६) असे मृताचे नाव असून ते उत्तर प्रदेशचे रहिवासी होते.

चोरट्याने ट्रकच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून पैसे शोधण्यास सुरूवात केली. त्यावेळी अचानक रमेशकुमार यांना जाग आली. त्यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने रमेशच्या छातीवर, पोटावर आणि हातावर चाकूचे घाव घातले. रमेश जखमी अवस्थेत ट्रकमधून खाली उतरले आणि जवळच्या ट्रकचालकाला मदतीस हाक दिली. यावेळी बलवंतसिंग यांना जाग आली, त्यांनी अल्लीपूर पोलिसांना याबद्दल माहिती दिली. परंतु, रक्तस्त्राव अधिक झाल्याने रमेशचा मृत्यू झाला.

आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

गुन्हेगाराने ही हत्या पैसे चोरण्याच्या उद्देशाने केल्याची कबुली दिली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या निर्देशाप्रमाणे निरंजन वरभे, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टनकर यांनी केली आहे.

Intro:R_MH_14_APR_WARDHA_HATYA_AROPI_ATAK_
व्हिजवल बाईट FTP केली आहे.

चोरी करतांना हत्या करणाऱ्या एका आरोपीला अटक,
- हत्येतील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू

वर्धा ते हिंगणघाट मार्गावर धोत्रा चौरस्त्या येथील शिवार धाब्यासमोर रात्री ट्रकचालकाची चोरट्याने धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. अज्ञात असलेल्या चोरट्याला हत्येचा गुन्ह्यात १० तासाच्या आत अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेल मोठे यश मिळाले रमेशकुमार नरसिंग यादव, वय ३६ वर्ष, रा. बिचलोर तालुका बेहरोली, महाराजगंज उत्तर प्रदेश असे मृतकाचे नाव आहे.

चोरट्याने ट्रकच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून पैसे हुडकने सुरू केले. त्यावेळी अचानक रमेशकुमारला जाग आली. या चोराला पकडण्याचा प्रयत्न असताना चोरट्याने रमेशच्या छातीवर, पोटावर व हातावर चाकूचे घाव लागले. जखमी अवस्थेत ट्रकमधून खाली उतरला. जवळच्या ट्रकचालकाला मदतीस हाक देऊ लागला. बलवंतसिंग याला जाग आली रमेशच्या आवाजाने जाग आली. अल्लीपुर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पण रक्तस्त्राव अधिक झाल्याने रमेशचा मृत्यू झाला.

सदरचा गुन्हा आव्हानात्मक असल्याने गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याकरिता गुन्ह्याची तपास चक्रे जलद गतीने शोध घेण्यात आला. अश्या प्रकारचे गुन्हे करणारा आरोपी राहुल भीमण्णा पवार, वय 19 वर्ष रा. हिगणघाट यास ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली. त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार रघु शास्त्री भोसले रा. यादगिरी कर्नाटक सोबत पैश्याचा उद्देशाने केल्याचे कबुली दिली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांचे निर्देशाप्रमाणे निरंजन वरभे, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टनकर चमूने केली.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.