ETV Bharat / state

वर्धा शहरातील सर्कस ग्राउंड परिसरातून देशी कट्टा जप्त, एकाला अटक

आकाश मोटघरे हा सर्कस ग्राउंड जवळ किरायाने राहतो. त्याच्याकडे देशी कट्टा असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलीस निरीक्षक धनाजी जळक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किरनाके यांनी तपास सुरू केला. सुरवातीला युवकाने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिलीत. मात्र, घराची तपासणी केली असता अंदाजे ५० हजार किंमतीचा देशी कट्टा बेड खाली दिसून आला.

देशी कट्टा जप्त
देशी कट्टा जप्त
author img

By

Published : Oct 3, 2020, 5:40 PM IST

वर्धा- रामनगर पोलिसांनी सर्कस ग्राऊंड जवळ राहणाऱ्या एका युवकाकडून एक देशी कट्टा जप्त केला आहे. आकाश उर्फ चकन अजय मोटघरे (वय २८) असे अटक झालेल्या युवकाचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक धनाजी जळक

आकाश मोटघरे हा सर्कस ग्राउंड जवळ किरायाने राहतो. त्याच्याकडे देशी कट्टा असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलीस निरीक्षक धनाजी जळक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किरनाके यांनी तपास सुरू केला. सुरवातीला युवकाने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिलीत. मात्र, घराची तपासणी केली असता अंदाजे ५० हजार किंमतीचा देशी कट्टा बेड खाली दिसून आला. देशी कट्ट्याचा उपयोग कुणावर होणार होता, याबद्दल पोलीस चौकशी सुरू आहे. दरम्यान, आकाशला ५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, पुढील तपास सुरू आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली.

तो कट्टा नागपुरातून आणण्यात आल्याची शक्यता..

आकाश मोटघरे याने नागपूर येथून देशी कट्टा आणल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे. तसेच, मोटघरेवर इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.