वर्धा - हिंगणघाट जळीतकांड पीडितेची मृत्यूची झुंज आज अखेर ८ दिवसानंतर अपयशी ठरली. या जळीतकांडातील पीडितेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसह इतर मदत देण्यात यावी, अशी मागणी दोराडावासीयांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्याकडे करण्यात आली.
हेही वाचा - LIVE : हिंगणघाट जळीतकांडातील पीडिता अनंतात विलीन, दारोडा ग्रामस्थ गहिवरले
पीडितेच्या कुटुंबीयांना १ कोटीची आर्थिक मदत, भावाला सरकारी नोकरी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, या तीन मुख्य मागण्या दारोडावासीयांनी कोरडे यांच्याकडे केल्या. या तिन्ही मागण्यांचा पाठपुरावा शासनाकडे करू, असे आश्वासन यावेळी कोरडे यांनी दिले.
हेही वाचा - हृदयद्रावक! प्रेमसंबंधातून मुलीचा पळून जाऊन विवाह, आई-वडिलांसह भावाने केली आत्महत्या
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज (सोमवारी) तिचा मृत्यू झाला.