वर्धा - मोदी सरकारकडून देण्यात आलेली आश्वासने खोटी असल्याचे जनतेला कळाले आहे. त्यामुळे मोदींच्या वर्ध्यातील सभेला किती लोक जमले होते हे देशांने बघितले. याविरुद्ध शुक्रवारी राहुल यांची सभा वर्ध्यात पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने लोक सभेला उपस्थित होते. यावरून जनतेने काय ठरवले आहे, हे कळून येते, असे मत वर्ध्यातील काँग्रेसच्या उमेदवार चारू लता टोकस यांनी व्यक्त केले.
काँग्रेस जी आश्वासने पूर्ण करू शकते त्याबद्दलच बोलली असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह असल्याचे म्हटले आहे. राहुल यांच्या सभेला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली होती. आम्ही पैसे देऊन गर्दी केली नसल्याचेही ते म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह असल्याचे बोलावले. तसेच सभेला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली. ही गर्दी पैसे देऊन देऊन आणली नाही असे म्हणत विरोधकांना टोला ही लगावला. तसेचा विजय होणार असा विश्वास सभेनंतर बोलून दाखवला.
Body:पराग ढोबळे,वर्धा
Conclusion: