ETV Bharat / state

कापसाच्या पेरणीसाठी गेलेल्या महिलेचा वीज पडून मृत्यू; मुलगा गंभीर - mother

वर्ध्यात कापसाच्या लावणीसाठी गेलेल्या आई आणि मुलावर अचानक वीज पडल्याने आईचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला.

स्वतःच्याच शेतात वीज पडून महिलेचा मृत्यू
author img

By

Published : Jun 22, 2019, 7:53 PM IST

वर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा शिवारात असलेल्या शेतात आईने आपल्या मुलासह कापसाच्या पेरणीसाठी गेली होती. ज्या पावसाची वाट पहात होते त्याच पावसाने घात केला. आकाशातून पडलेल्या विजेने आईचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. सुमती कारोटकर (वय ५५) असे मृत महिलेचे नाव तर निलेश (वय ३२) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

स्वतःच्याच शेतात वीज पडून महिलेचा मृत्यू
देवळी शहराला लागून असलेल्या एकपाळा शिवार असलेल्या शेतात आई सुमती आणि मुलगा निलेश हे मजुरांकडे लक्ष देण्यासाठी शेतात गेले. पावसाचा अंदाज धरून पेरणी करणे याकडेच शेतकऱ्यांचे सारे लक्ष लागून असते. शेतात चार मजुरासह नीलेश आईसोबत शेतात कापसाची लावण करत होता. दुपारी दोघांनी जेवण केले. पुन्हा लागवडीच्या कामाला लागले. पण कोणास ठावुक नियतीच्या मनात काय असते.एवढ्यातच पाऊस सुरू झाला. दोघांनी शेतातली कडुलिंबाच्या झाडाचा आसरा घेतला. यावेळी वीजेचा कडकडाट सुरू झाला. एवढ्यात वीज अंगावर पडल्याने निलेशच्या आईचा मृत्यू झाला. तर निलेश हा गंभीर जखमी झाला. शेतातील मजुरांना कळताच त्यानी दोघांना उचलत शेतातून बाहेर आणले. आणि कुटुंबाला याची माहिती दिली. दोघांना सावंगी मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी महिलेला मृत घोषित केले. तर निलेश कारोटकर याच्यावर उपचार सुरु आहे. सुमती यांच्या मागे पती दोन मुले, मुली असा परिवार आहे. देवळी पोलिसांनी पंचनामा करत आकस्मित मृत्यूची नोंद केली.

Intro:महिलेचा स्वतःच्याच शेतात वीज पडून मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

वर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा शिवारात असलेल्या शेतात कापशीची लावण होती. यासाठी मुला सोबत लक्ष ठेवण्यासाठी आई सोबत गेली. पण ज्या पावसाची बरसण्यासाठी डोळे आकाशाकडे लावून होते. त्याच सोबत पडलेल्या विजेने आईचा घात केला. तेच मुलगाही गंभीर जखमी झाला. सुमती कारोटकर वय 55 मृतक महिलेचे तर निलेश वय 32 असे मुलाचे नाव आहे.

देवळी शहराला लागून असलेल्या एकपाळा शिवार असलेल्या शेतात आई सुमती आणि मुलगा निलेश हे मजुरांकडे लक्ष देण्यासाठी शेतात गेले. पावसाचा अंदाज धरून पेरणी करणे याकडेच शेतकऱ्यांचे सारे लक्ष लागून असते. शेतात चार मजुरासह नीलेश त्याचा आईसोबत शेतात कपाशीची लावण करत होता. दुपारी दोघांनी जेवण केले. पुन्हा लागवडीच्या काम लागले. पण कोणास ठावुन नियतीच्या मनात काय असते.

एवढ्यातच पाऊस सुरू झाला. दोघांनी शेतातली कडुलिंबाच्या झाडाचा आसरा घेतला. यावेळी वीजेचा कडकडाट सुरू झाला. एवढ्यात वीज अंगावर पडल्याने निलेशच्या आईचा मृत्यू झाला. तर निलेश हा गंभीर जखमी झाला. शेतातील मजुरांना कळताच त्यानी दोघांना उचलत शेतातून उचलत बाहेर आणले. कुटुंबियांना माहिती दिल्याने सगळं घटनास्थळी पोहचले. दोघांना सावंगी मेघे रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी महिलेला मृत घोषित केले. तेच निलेश कारोटकर हा गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरु करण्यात आला आहे.

सुमती यांच्या मागे पती दोन मुलं मुली असा आप्त परिवार आहे. देवळी पोलिसांनी पंचनामा करत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. यात निलेशच्या हातात मोबाईल असल्याचे बोलाले जात आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.