वर्धा - कारंजा तालुक्यातील राहटी जंगल परिसरात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या मजुराचा तीन वाघांच्या हल्लात मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुकुंद ढोके असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुकुंद यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगाही होता. या दोघांसमोर वाघांनी मुकुंद यांना फरफटत नेल्याचे सांगण्यात येत आहे.
तीन वाघांचा हल्ला..
कारंजा तालुक्यातील नांदोरा येथील मुकुंद आपली पत्नी, मुलगा आणि नातलगासोबत जंगलात तेंदुपत्ता आणण्यासाठी गेले होते. यावेळी तेंडुपत्ता तोडण्याचे काम सुरू असताना मुकुंद यांच्यावर अचानक तीन वाघांनी हल्ला केला. त्यात एक वाघीण आणि दोन वाघ असल्याचे सांगण्यात येत जात आहे. हल्ल्यानंतर वाघांनी मुकुंद यांना काही अंतरावर फरफटत नेले. यावेळी मुकुंद ढोके यांनी सोबत असलेल्यांच्या आवाज देण्याच्या प्रयत्न करण्यात आला. पण कोणाचा लक्षात आले नाही. पण काही वेळाने त्या ठिकाणी तीन पट्टेदार वाघ दिसून आल्याचे मृतकाचे नातेवाईक रत्ना ढोक यांनी सांगितले.