वर्धा - कारंजा तालुक्यातील सेलगाव परिसरातील शेतातील माकडांना जंगलाच्या दिशेने हाकलून लावताना गावकऱ्यांना मादी बिबट दिसून आली. याच ठिकाणी बिबट्याचे दोन पिल्लेही दिसून आली. यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्याने मागे फिरत ही माहिती वन विभागाला दिली आहे. हा बिबट्या वन कक्ष क्रमांकाच्या 121च्या हद्दीतील मादी बिबट असून वन विभागाने ट्रॅप कॅमेरा लावून नागरिकांना त्या भागात न जाण्याच्या सूचना केल्या आहेत.
वर्धा; शेतालगतच्या परिसरात आढळले मादी बिबट्यासह दोन पिल्ले - leopard found wardha news
वन विभागाने खबरदारी म्हणून त्या भागात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. याठिकाणी गस्त घालण्यासाठी वन रक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना या भागात जाण्यास मनाई केली आहे.
मादी बिबट्यासह दोन पिल्ले
वर्धा - कारंजा तालुक्यातील सेलगाव परिसरातील शेतातील माकडांना जंगलाच्या दिशेने हाकलून लावताना गावकऱ्यांना मादी बिबट दिसून आली. याच ठिकाणी बिबट्याचे दोन पिल्लेही दिसून आली. यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्याने मागे फिरत ही माहिती वन विभागाला दिली आहे. हा बिबट्या वन कक्ष क्रमांकाच्या 121च्या हद्दीतील मादी बिबट असून वन विभागाने ट्रॅप कॅमेरा लावून नागरिकांना त्या भागात न जाण्याच्या सूचना केल्या आहेत.
Last Updated : Jun 23, 2021, 1:25 PM IST
TAGGED:
leopard found wardha news