ETV Bharat / state

वर्ध्यात कोरोनाबाधितांची संख्या 34 वर, शहरासह 9 ग्रामपंचायतीत तीन दिवस संचारबंदी

वर्ध्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 34 वर गेली असून शहरासह 9 ग्रामपंचायतीत तीन दिवस संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. आज दिवसभरात चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. हे चारही रुग्ण पिपरीच्या लग्नसोळ्यातील हायरिस्कमधील आहेत. अजून अहवाल येणे बाकीच.

number of coronary patients in Wardha is 34
वर्ध्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 34 वर
author img

By

Published : Jul 10, 2020, 8:47 PM IST

वर्धा - वर्ध्याच्या पिपरी मेघेच्या लग्न सोहळ्याने प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज चार नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. हे चारही रुग्ण नवविवाहित नवरदेचाचे निकटवर्तीय आहेत. यात सकाळी पत्नी आणि आई तर दुपारी मामाचा मुलगा आणि मुलगी असे चार जण कोरोनाबाधित झाल्याचे पुढे आले.

दुपारी पॉझिटिव्ह रुग्ण शहराच्या मध्यभागातील गजबजलेल्या इतवारा परिसरातील असल्याने शहरासह 9 ग्रामपंचायतीत संचार बंदीचे आदेश उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिलेत. वर्ध्यातील पिपरीच्या शिवराम वाडीत 30 जून रोजी लग्नसोहळा पार पडला. यात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या पाहुण्यातून चक्क नवरदेवलाच कोरोनाची बाधा झाली. नवविवाहित नवरदेव सात दिवसांनी पॉझिटिव्ह आल्याने चांगलीच खळबळ माजली.

यामुळे जवळपास 35 ते 40 जण हायरिस्क मधील निकटवर्तीयांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. यात त्या नवविवाहित नवरदेवाची पत्नी आणि आई पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल सकाळी आला आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून तीन दिवस पिपरी मेघेत संचारबंदी लागू केली होती. आज दुपारी गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी इतवारा परिसरातील नवविवाहित नवरदेवाचा मामाचा मुलगा आणि मुलगी पॉझिटिव्ह आल्याने अजून खळबळ माजली. यात हा बाजार परिसर असल्याने सात दिवस बंद ठेवावा याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी एसडीओ सुरेश बगळे यांच्याशी चर्चा केली. पण परिस्थिती पाहता अखेर शहर आणि त्याला लागून असलेले 9 ग्रामपंच्यायतमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. ही संचारबंदी 10 जुलै रात्री 8 वाजल्यापासून 13 जुलै रात्री 12 पर्यंत लागू असणार आहे.

इतवारा परिसरात 70 ते 80 घरांसाठी कंटेंमेंट झोन लागू

पिपरी मेघे परिसरातील रुग्ण संख्येतून बाधित झाल्याने आज शहराच्या इतवरा परिसरात तिसरा कंटेंमेंट झोन तयार करण्यात आला आहे. यामध्ये नवरदेवाची मामाचा मुलगा आणि मुलगी यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर कंटेंमेंट झोन म्हणून लागू केला आहे. यात 60 ते 70 घरांचा समावेश असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी ईटीव्हीला दिली.

या ग्रामपंच्यायातीचा संचारबंदीत असणार समावेश

वर्धा शहर आणि शहराला लागून असलेल्या 9 ग्रामपंचायती ज्यांमध्ये सावंगी मेघे, पीपरी मेघे, उमरी मेघे, सिंदी मेघे, बोरगाव, मसाळा, सातोडा, नालवाडी नटाळा, या ग्रामपंचायत मध्ये संचारबंदी लागू राहील. या काळात नागरिकांनी घरी राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.यावेळी इतवारा परिसरात उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, पोलीस उपविभागीय अधिकारी पियुष जगताप, तालुका आरोग्य अधिकारी माधुरी बोरकर, नगर परिषदचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी भागाची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.