ETV Bharat / state

पूर्व विदर्भातील शेतकऱयांच्या वीज जोडणीसाठी स्वतंत्र धोरण राबविणार - मुनगंटीवार

सोलर कृषी पंपासाठी शेतकऱयाने अर्ज दिल्यापासून एक महिन्याच्या आत शेतात सोलर पंप लागणे गरजेचे आहे. संबंधित एजन्सीने हे काम प्राधान्याने करावे. ठराविक कालावधीपेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर अशा एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

author img

By

Published : Jun 3, 2019, 3:33 AM IST

सुधीर मुनगंटीवार

वर्धा - सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱयांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शेतकऱयांना सोलर कृषी पंपांच्या माध्यमातून वीज जोडणी दिल्या जात आहे. शेतकऱयांच्या वीज जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती अर्थ व नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

एक महिन्यात सोलर कनेक्शन द्या, अन्यथा एजन्सीवर गुन्हे दाखल करा
इतर विभागाच्या बैठकीपेक्षा खरीप आढावा व नियोजन बैठक अतिशय महत्वाची असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सोलर कृषी पंपासाठी शेतकऱयाने अर्ज दिल्यापासून एक महिन्याच्या आत शेतात सोलर पंप लागणे गरजेचे आहे. संबंधित एजन्सीने हे काम प्राधान्याने करावे. ठराविक कालावधीपेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर अशा एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

उद्दिष्टपूर्तीसाठी कामे करू नका...
पीक कर्जासाठी शेतकऱयांच्या अर्जाची वाट न पाहता शेतकऱयांपर्यंत कृषी विभाग आणि बँकांनी पोहचले पाहिजे. यासाठी शेतकऱयांचे मेळावे घ्या. या मेळाव्यात जास्तीत जास्त शेतकरी येतील याची काळजी घ्यावी. केवळ उद्दिष्ट पुर्तीकरीता मेळावे घेऊ नका. शेतकऱयांना पीक कर्ज नाकारणे योग्य नाही असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

शेतकऱयांना केंद्रबिंदू मानून खरीपाबाबत योग्य नियोजन करा...
जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकाऱयापासून कृषी सहाय्यकापर्यंत सर्वांनी शेतकऱयांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी. केवळ लक्षांकासाठी तपासणी मोहीम किंवा काम करून नये असा उल्लेख करत विभागाचे कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत सुचना दिल्या.

बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी त्वरित कारवाई करा. भरारी पथकामध्ये प्रामाणिक आणि चांगल्या अधिकाऱयांची नियुक्ती करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत. काही वरिष्ठ अधिकाऱ्याची शेतकऱयांप्रति असलेली अनास्था दिसल्यामुळे थेट पालकमंत्र्यांनी अशा शब्दात सूचना देण्याची वेळ आली. सिंचनाचे उद्दिष्ट व इतर अनुषांगिक माहिती यासाठी एक पुस्तिका तयार करून ती लोकप्रतिनिधींना द्यावी. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या १०० टक्के समन्वयाशिवाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकत नाही. असे मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, आमदार समीर कुणावार, रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, कृषी सभापती मुकेश भिसे, राज्य कृषी आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मंचावर उपस्थित होते.

Intro:
पूर्व विदर्भातील शेतक-यांच्या वीज जोडणीसाठी स्वतंत्र धोरण राबविणार - पालकमंत्री मुनगंटीवार

- सहा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना होणार फायदा
- 2019-20 खरीप नियोजन आढावा बैठक
- शेतक-यांबाबत संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश
- खरीप हंगामासाठी 4 लक्ष 28 हजार हेक्टरचे नियोजन

सिंचनाच्या माध्यमातून शेतक-यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शेतक-यांना सोलर कृषी पंपांच्या माध्यमातून वीज जोडणी दिल्या जात आहे. शेतकरी सुध्दा अर्ज करीत आहे. यामुळे शेतक-यांच्या वीज जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती अर्थ व नियोजन, वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या सन 2019-20 खरीप नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते.

एक महिन्यात सोलर कनेक्शन द्या, अन्यथा एजन्सीवर गुन्हे दाखल करा....

इतर विभागाच्या बैठकीपेक्षा खरीप आढावा व नियोजन बैठक अतिशय महत्वाची असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सोलर कृषी पंपासाठी शेतक-याने अर्ज दिल्यापासून एक महिन्याच्या आत शेतात सोलरपंप लागणे गरजेचे आहे. संबंधित एजंन्सीने हे काम प्राधान्याने करावे. ठराविक कालावधीपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर अशा एजंन्सीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

उद्दिष्ट्यपूर्तीसाठी कामे करू नका...

पीक कर्जासाठी शेतक-यांच्या अर्जाची वाट न पाहता शेतक-यांपर्यंत कृषी विभाग आणि बँकांनी पोहचले पाहिजे. यासाठी शेतक-यांचे मेळावे घ्या. या मेळाव्यात जास्तीत जास्त शेतकरी येतील याची काळजी घ्यावी. केवळ उद्दिष्ट पुर्तीकरीता मेळावे घेऊ नका. शेतक-यांना पीक कर्ज नाकारणे योग्य नाही असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

शेतक-यांना केंद्रबिंदू मानून खरीपाबाबत योग्य नियोजन करा...
जिल्हा अधिक्षक, कृषी अधिका-यापासून कृषी सहाय्यकापर्यंत सर्वांनी शेतक-यांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी. केवळ लक्षांकासाठी तपासणी मोहीम किंवा काम करून नये असा उल्लेख करत विभागाचे कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत सुचना दिल्यात. बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी त्वरित कारवाई करा. भरारी पथकामध्ये प्रामाणिक आणि चांगल्या अधिका-यांची नियुक्ती करा असे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत. काही वरिष्ठ अधिकाऱ्याची शेतकऱयांन प्रति असलेली अनास्था पाहता थेट पालकमंत्र्यांनी अशा शब्दात सूचना देण्याची वेळ आली.

सिंचनाचे उद्दिष्ट व इतर अनुषांगिक माहिती यासाठी एक पुस्तिका तयार करून ती लोकप्रतिनिधींना द्यावी. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या 100 टक्के समन्वया शिवाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकत नाही.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, आमदार समीर कुणावार, रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, कृषी सभापती मुकेश भिसे, राज्य कृषी आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मंचावर उपस्थित होते.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.