वर्धा - जुन्या पडीक घराचे खोदकाम करताना ढिगारा शेतात टाकला. यावेळी ढिगाऱ्यातील माती, दगड-गोटे वेचण्याचे काम शेतातील मजूर करत होते. यावेळी त्यात एका डब्बीत कचरा साफ करताना सोने सापडले. या ढिगाऱ्यात मोगलकालीन नाणे, दागिने मिळून आले. पुरातत्त्व विभागाशी संबधित विषय असून ते त्यांना हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती पुलगाव पोलिसांनी दिली असून हे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
वर्ध्याच्या नाचणगाव येथे सतीश उल्हास चांदोरे यांच्या जुन्या घराचे खोदकाम सुरू होते. यावेळी घरातून निघालेले मातीचे ढिगारे शेतात टाकण्यात आले. हाच मलबा शेतात टाकताना यात एक डबी मिळाली. त्यामध्ये सोने आढळून आले. यात सोन्याचे एक बिस्कीट आणि मोगलकालीन नाणे, कानातील रिंग असे एकूण 9 प्रकारचे दागिने मिळून आले. यामध्ये 428 ग्रॅम वजन असललेले सोनं असून आजची बाजार किंमत 20 लाख 54 हजार इतकी आहे.
हे ही वाचा - बार-हॉटेल मालकांप्रमाणे शेतकरी, कष्टकऱ्यांचीही दखल घ्या; रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र
पोलिसांनी हे सोने ताब्यात घेतले असून ही बाब पुरातत्व विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्याशी संपर्क साधत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.
हे ही वाचा - पोलीस निरिक्षक पतीचा कोरोनाने मृत्यू, तिसऱ्याच दिवशी डॉक्टर पत्नी कामावर झाली रुजू