ETV Bharat / state

डोक्यात संशयाचे भूत, जन्मदात्या मातेकडूनच १६ महिन्याच्या चिमुकल्याचा घात

पतीवरील संशयामुळे जन्मदात्या मातेकडूनच चिमुकल्याचा घात झाल्याची घटना वर्ध्यातील आर्वी येथील सावळापूर येथे घडली. तिने बाळासह विहिरीत उडी घेतली होती. मात्र, त्यामध्ये बाळाचा मृत्यू झाला आहे.

मृत चिमुकला
author img

By

Published : Sep 23, 2019, 6:22 PM IST

Updated : Sep 23, 2019, 11:54 PM IST

वर्धा - जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सावळापूर येथे पतीवरील संशयामुळे पत्नीने 16 महिन्याच्या चिमुकल्याला घेऊन विहिरीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये आईला वाचविण्यात यश आले. मात्र, १६ महिन्याच्या चिमुकल्याचा जीव गेला. याप्रकरणी आईवरच हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संघर्ष निंबाळकर, असे मृत बालकाचे नाव असून प्रिया असे आईचे नाव आहे.

डोक्यात संशयाचे भूत, जन्मदात्या मातेकडूनच १६ महिन्याच्या चिमुकल्याचा घात

हे वाचलं का? - मुलीची छेड काढल्याची पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून जळगावात तरुणाचा खून

आर्वीपासून 4 किमी अंतरावर वर्धा मार्गावर सावळापूर गाव आहे. येथील योगेश निंबाळकर यांचा सुकळी भादोड येथील प्रियाशी 2016 मध्ये विवाह पार पडला. दोघांचा सुखी संसार सुरू होता. काही दिवसांपूर्वी त्यांना मुलगाही झाला. मात्र, प्रियाच्या मनात योगेशच्या नात्यातील महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयाने घर केले. याच संशयाने सुखी संसाराला आग लागली. त्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार खटके उडत होते.
योगेशने गेल्या २ महिन्यांपूर्वी तिला माहेरी सुद्धा सोडले होते. मात्र, तिची समजूत काढून १ महिन्यांपूर्वी सावळापूरला आणले. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुलगा रडत होता. त्यामुळे ती घराबाहेर पडली. यावेळी तिने घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विहिरीत उडी घेतली. यावेळी शेजाऱ्याच्या लक्षात आल्याने त्यांनी योगेशच्या आई-वडिलांना सांगितले. कुटुंबीयांनी तत्काळ विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी मुलगा पाण्यात होता आणि ती पाण्यात हात-पाय मारत होती. त्यामुळे स्थानिकांनी लगेच दोघांनाही बाहेर काढले. मुलगा हालचाल करत नसल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

हे वाचलं का? - वर्ध्यात पाचशे रुपयांच्या वादातून युवकाची हत्या; अल्पवयीन मुलाला अटक, वडील फरार

जन्मदाती आईच संघर्षच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. त्यामुळे तिला अटक करण्यात आली असून तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्वी पोलीस करत आहे.

यापूर्वी २ वेळा आत्महत्येचा प्रयत्न -
प्रियाने यापूर्वी देखील २ वेळा विहिरित उडी घेऊन आत्महत्येच्या प्रयत्न केला. पती योगेशने दोन्ही वेळी तिला अडवत घरी परत आणले. मात्र, रविवारच्या रात्री झालेल्या प्रयत्नात संघर्षला घेऊन उडी घेतल्याने त्याचा विहिरीच्या पाण्यात बुडवून मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Intro:mh_war_03_succide_vis1_7204321

जन्मदात्या आईवरच 16 महिन्याच्या चिमुकल्याच्या हत्येचा गुन्हा दाखल
- जगण्याचा 'संघर्षा'त अपयशी ठरला

वर्धा - वर्ध्यातील आर्वी तालुक्याच्या सावळापूर येथे धक्कादायक घटना घडली. पतीवर संशय घेणाऱ्या पत्नीने 16 महिन्याच्या चिमुकल्याला घेऊन विहरित उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात आईला वाचविण्यात यश आले असलें तरी 16 महिन्याच्या चिमुकलल्याचा जिव गेला. संशयाचे भूत डोक्यात घेत रागाचा भरात केलेल्या या कृत्यामुळे जन्मदात्या आईवरच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. संघर्ष निंबाळकर असे मृत बालकाचे नाव असून प्रिया आईचे नाव आहे.

आर्वी पोलीस स्टेशन अंतर्गत आर्वी पासून 4 किमी अंतरावर वर्धा मार्गावर सावळापूर हे गाव आहे. योगेश निंबाळकर याचा सुकळी भादोड येथील प्रिया हिच्याशी 2016 मध्ये विवाह पार पडला. दोघांचा सुखी संसार सुरू होता. संघर्ष नावाचा बाळाचा 16 महिण्या अगोदार जन्म झाला. यात प्रियाच्या मनात योगेशचा नात्यातील महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयाने घर केले. याच संशयाने सुखी संसाराला आग लागली.

याच कारणावरून त्यांचे भांडण होऊ लागले. दोन महिन्यांपूर्वी तिला माहेरी सुद्धा सोडून आल्याचे योगेश तक्रारीत म्हटले आहे. यात नुकताच एक महिन्यांपूर्वी तिची समजूत काढून माहेवरून घरी सावळापुरला आणले. काल रात्री मुलगा रडत सुमारे 12.30 च्या सूमारास घराबाहेर पडली. यावेळी घरापासून हाकेच्या अंतरावर असलेली विहरित तिने उडी घेतली. गावातील एकाच निदर्षणास आल्याने बाहेर झोपून असलेल्या योगेशच्या आई वडिलांना सांगीतले. लागलीच कुटुंबीयांनी विहिरीकडे धाव घेतली. यावेंळी मुलगा हा पाण्यात दिसला आणि प्रिया ही पाण्यात हात पाय मारत होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने लगेच दोघांना बाहेर काढण्यात आले. मुलगा हालचाल करत नसल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यात संघर्ष हा विहिरीच्या पाण्यात जगण्याचा संघर्षात हरला. यात त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणात आईच्या मुळेच मुलाचा जीव गेला असल्याने जन्मदाती आईच संघर्षच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रिया निंबाळकर हिला अटक करण्यात आली. पुढील तपास आर्वी पोलीस करत आहे.

यापूर्वी दोन वेळा केला आत्महत्येचा प्रयत्न
- यात प्रिया निंबाळकर हिने दोन वेळा विहरित उडी घेऊन आत्महत्येच्या प्रयत्न केला. दोन्ही वेळेस पती योगेश यांनी तिला अडवत घरी परत आणले. यात मात्र रविवारच्या रात्री झालेल्या प्रयत्नात संघर्षला घेऊन उडी घेतल्याने त्याचा विहिरीच्या पाण्यात बुडवून मृत्यू झाला. प्रिया हिने संशयावरून रागाचा भरात तिसर्यादा आत्महत्येचा प्रयत्न केला. या रागाने तिला पोटच्या मुलाच्या हत्येसाठी जवाबदार ठरवले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 11:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.