वर्धा - कोरोनाच्या लढयात हात स्वच्छ धुणे आणि स्वतःचे निर्जंतुकीकरण करणेही महत्त्वाचे आहे. सॅनिटायझर हे निर्जंतुकीकरण करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. रोहित पवार आणि मित्रमंडळ आणि बारामती अॅग्रोच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हे सॅनिटायझर पोहचवले जात आहे. शनिवारी वर्धा जिल्हा प्रशासनाला 1 हजार लिटर सॅनिटायझर देण्यात आले.
कोरोनाच्या लढयात आमदार रोहित पवारांकडून जिल्ह्याला 1 हजार लिटर सॅनिटायझरची मदत जिल्ह्याला 1 हजार लिटर सॅनिटायझरची मदत यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे आणि तहसीलदार प्रीती डुडुलकर यांच्याकडे एक हजार लिटरचा साठा सुपूर्द करण्यात आला आहे. हा साठा जिल्ह्यात गरजेनुसार वाटप करण्याचे काम जिल्हा प्रशासन करणार असल्याचे सांगितले जात आहे. या माध्यमातून ग्रामीण भागासह काही भागात ही मदत मोलाची ठरणारी आहे.
जिल्ह्याला 1 हजार लिटर सॅनिटायझरची मदत रोहित पवार मित्र मंडळ आणि बारामती अॅग्रो लिमीटेडच्या वतीने सॅनिटायझरचा तुटवडा आणि काळाबाजाराबार पाहता या उपक्रमाला सुरवात केली आहे. जिल्ह्याला सुरू असलेली ही मदत मोलाची ठरणारी आहे. मालवाहू वाहनात भरलेले सॅनेटायझरचे कॅन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, पंचायत समिती उपसभापती संदीप किटे, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, प्रदेश सचिव शिवराज शिंदे यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.