ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : 'आरोपीलाही तशाच प्रकारच्या यातना देऊन फाशी द्या'

author img

By

Published : Feb 6, 2020, 7:31 AM IST

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नांदोरी चौकात प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणी ही ४० टक्के भाजली असून तिच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

march-in-wardha-for-justice-to-hinganghat-lady
हिंगणघाट जळीतकांड

वर्धा- हिंगणघाट जळीतकांड घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. खासदार नवनीत राणा, वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी हा मुद्दा लोकसभेत मांडला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे यांनीही डोक्याला काळी फित बांधून निषेध व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा द्या, अशी मागणी केली. तर सिंदी रेल्वे, वायगाव, जाम येथे कडकडीत बंद पुकारण्यात आला होता.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी वर्ध्यात निषेध मोर्चा...

हेही वाचा- निर्भया प्रकरण : दोषी अक्षय ठाकुरची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे यांच्यासह कारंजा शहरात महिलांनी तहसील कार्यालयात एकत्र येत काळी फित बांधून निषेध व्यक्त केला. हे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. अशा मानसिकतेच्या व्यक्तीला तशाच यातना देऊन फाशी द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया सरिता गाखरे यांनी व्यक्त केली.

यावेळी समुद्रपूर तालुक्यात सिंदी रेल्वे, देवळीतील वायगाव येथेही बंद पुकारून मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी कारंजा येथील मोर्चात जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खवशी, माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश खवशी, हेमंत बन्नगरे यांच्यासह महिलांचा सहभाग होता.

Intro:mh_war_morcha_reaction_on jivan ghat_incident_pkg_7204321
बाईट जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे.

...अन जिल्हा परिषद अध्यक्षा काळी फीत डोक्याला बांधून पोहचल्या तहसीलदाराचा दालनात

- हिंगणघाट जळीत कांडाचे पडसाद कारंजा सह इतर भागातही

जिल्हापरिषद अध्यक्षचे मुख्यमंत्री तहसीलदार यांच्या मार्फत काळी फिट बांधून निवेदन

प्रतिक्रिया देताना जीप अध्यक्ष सरिता गाखरे भावुक
वर्धा - हिंगणघाट इथल्या प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्ना करण्यात आला. याच घटनेबद्दल रोष आणि राग महराष्ट्रभर दिसू लागलाय. लोकसभा सभागृहात अमरावतीच्या खासदार नवनीत राना आणि वर्ध्याचे खासदार रामदास तडस प्रश्न उपस्थित करत लक्ष वेधले. यासह मिनी मंत्रालाय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे यांनीही काळ्या फीत डोक्याला बांधून निषेध केला. महिलाना सोबत घेत आरोपीला कठोर शिक्षा द्या अशी मागणी केली. यासह सिंदी रेल्वे, वायगाव, जाम येथेही कडकडीत बंद पुकारण्यात आला.

सर्वांसाठी धक्कादायक विकृत भावनेतून घडलेले कृत्य हिंगणघाटच्या नंदोरी चौकात घडले. या घटनेतील पीडित तरुणी मृत्यूशी झुंज देत वेदना सहन करत आहे. याचा घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा करावी फाशी द्यावी अश्या भावना व्यक्त होत आहे.

कारंजा शहरात आशा दिवसानिमित्य एकत्र आलेल्या महिलांनी होणाऱ्या अत्याचाराला उत्तर देण्यासाठी तहसील कार्यालयात जाऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे यांच्यासह इतर महिलांनी काळ्या फिती बांधून निषेध करत रोष व्यक्त केला.

यामुळे महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत चंद्रावर पोहचल्या असे असतांना होणारे कृत्य घृणास्पद आहे. यामुळे अशा आरोपीला त्याच यातना देऊन फाशी द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया सरिता गाखरे यांनी ईटीव्ही भारतला व्यक्त केली.

यासह समुद्रपूर तालुक्यात सिंदी रेल्वे, देवळीतील वायगाव येथेही बंद पुकारात मोर्चा काढण्यात आला. यात शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला. यामध्ये शाळकरी विद्यार्थी विद्यार्थीनी सहभाग घेतला यात रोष व्यक्त करत आरोपीला फाशीची शिक्षा द्या, हैद्राबादची पुनरावृत्ती घडवा असा शब्दत रोष व्यक्त केला.

यावेळी कारंजा येथील मोर्च्यात जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, जीप सदस्य सुरेश खवशी, माजी पस सभापती मंगेश खवशी , हेमंत बन्नगरे यांच्यासह शेकडो महिलांची या मोर्चाला उपस्थिती होतीBody:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.