वर्धा- जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी अवयव काढून टाकण्याचे सुमारे १ लाख प्रकरण उघडकीस येतात. रक्ताच्या गुठळ्यामुळे होणारा आजार आणि उपचारामुळे अपंगत्वाला रोखण्यासाठी ‘लव्ह युवर लिम्ब्ज’ या जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. डीप-व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) जागरूकता मासच्या निमित्ताने बीडी-इंडियाने आणि स्थानिक आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने या जनजागृती कर्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
उपक्रमाच्या माध्यमातून मधुमेहाच्या रुग्णांना फूट अल्सरमुळे येणारे अपंगत्व शस्त्रक्रिया न करता रोखता येऊ शकेल याची माहिती रुगणालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. डीप-व्हेन थ्रॉम्बोसिस यालाच सामान्य भाषेत रक्ताच्या गुठळ्या म्हणून ओळखल्या जाते. यामुळे दरवर्षी १ लाख ८५ हजार रुग्णांचे अवयव काढून टाकले जातात. अवयव काढल्यामुळे अपंगत्वाला सामोरे जावे लागते. या रुग्णांमध्ये ७० टक्के रुग्ण हे मधुमेहाचे असल्याचेही पुढे आले आहे. यामुळे 'लव्ह युवर लिम्ब्ज' मध्ये जनजागृती करून या आजाराल रोखण्याचे प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी प्रत्येक महिन्याला एक शिबीर घेऊन त्यामध्ये रोगाची लक्षणे आणि त्यावर शस्त्रक्रिया रहित उपचाराची माहिती दिला जाणार आहे.
नुकत्याच मध्यप्रदेशातून आलेल्या रुग्णाच्या पायाला रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. त्यामुळे, त्याला पायाला वेदना होत होत्या आणि गँगरीन होण्याला सुरवात झाली होती. मात्र, एका छोट्याशा बलून आणि स्टेंटच्या माध्यमातून उपचार करत त्याचे निदान करण्यात आले असल्याचे डॉ. पंकज बनोदे यांनी सांगितले. रक्ताच्या गुठळ्याकडे होणारे दुर्लक्ष हे जगभरातील विकलांगतेच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, शिबिराच्या माध्यमातून डीव्हीटी व डायबेटिक फूट अल्सर रुग्णांवर लक्ष केंद्रित करून ‘लव्ह युवर लिम्ब्ज’ (तुमचे अवयव जपा) हा संदेश पोहोचवनार असल्याचे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. पंकज बनोदे यांनी सांगितले.
काय आहे यावर उपचार ? कशी असते लिम्ब सेल्वेज प्रक्रिया
या उपचारांमध्ये एण्डोव्हॅस्क्युलर प्रक्रिया तंत्रांचा समावेश होतो. यात टोकावर एक छोटा बलून लावलेले उपकरण रक्तवाहिणीत सरकवले जाते. हे यंत्र रक्ताची गुठळी असणाऱ्या अरथळ्यापर्यंत पुढे नेले जाते. मग हा फुगा फुगवला जातो. त्यामुळे रक्तवाहिनीच्या ब्लॉक सपाट होऊन रक्तवाहिनी खुली होते आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. मग फुग्यातली हवा काढून तो शरीराबाहेर काढला जातो. ही प्रक्रिया पूर्ण झाली की अँटि-प्रोरिफरेटिव्ह औषधांचे आवरण असेलेला एक नवीन फुगा पायाच्या त्याच रक्तवाहिनीत सरकवला जातो आणि यापूर्वी उपचार केलेल्या आकुंचित क्षेत्रापर्यंत पुढे नेला जातो. मग हा फुगा फुगवला जातो आणि फुग्याला लावलेले औषध रक्तवाहिनीच्या भित्तीकेवर तसेच आसपासच्या पेशींवर सोडले जाते. ठराविक कालावधीनंतर फुग्यातील हवा काढून तो शरीराबाहेर काढला जातो.
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये याचे काय लक्षणे असतात
चालताना पायात तीव्र वेदना होणे, संवेदना कमी होणे, बधीरपणा किंवा मुंग्या आल्याची संवेदना, जळजळीची भावना, त्वचा फिकी पडणे, लाल रेषा उठणे ब्लिस्टर्स किंवा अन्य वेदनारहित जखमा होणे, पायाचा रंग काळसर होणे यासारखी लक्षणे असतात. या लक्षणांकडे दृर्लक्ष करणे अवयवाला मुकावे लागणारे ठरते. यामुळे यावर वेळीच निदान करून घेणे फायद्याचे असल्याचे सुद्धा सांगितले जाते. या जनजागृती कार्यक्रमाला डॉ. संदीप श्रीवास्तव, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. पंकज बनोदे, रोहितकुमार, अभ्यूदय मेघे, संजय इंगळे तिगावकर यांची उपस्थित होती.
हेही वाचा-'एनपीए' खात्यालाही कर्जमाफीचा लाभ ! मात्र, 15 टक्के भार बँकांना सोसावा लागणार