वर्धा - जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधात अजून पाच दिवस वाढ झाली आहे. याबाबत प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळा जगताप यांनी संताप करत तहसीलदारांच्या दालनाबाहेर फळे टाकून संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी शेतकरी आणि फळ विक्रेत्यांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत तहसीदारांकडे व्यथा मांडल्या आहेत.
वारंवार लावण्यात येणाऱ्या निर्बंधांमुळे फळ विक्रेत्यांचे नुकसान -
8 मे ते 13 पर्यंत असणारा लॉकडाऊन 18 मे पर्यंत वाढवण्यात आली. यामुळे आर्वीत प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या दालनापुढे खराब झालेले आंबे, केळी ही फळे आणून टाकली. प्रशासनातर्फे वारंवार लावण्यात येणाऱ्या निर्बंधांमुळे फळ विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील फळे, भाजीपाला टोमॅटो हे शेतातच सडण्याची वेळ आली आहे. याचा शेतकऱ्यांना व फळ विक्रेत्यांना आर्थिक फटका बसत आहे. हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
फळे, भाजीपाला विक्रेत्यांना दिलासा -
तहसीलदार चव्हाण आणि एसडीओ धार्मिक यांनी त्यांची अडचण समजून घेत, फळ विक्रेते यांची यादी द्या, त्यांना अकरा वाजेपर्यंत फळ विकण्यास परवानगी देऊ असे सांगितले. यामुळे फळे विक्रेते, अंडी, भाजीपाला उत्पादक यांना दिलासा मिळाला.
हेही वाचा - 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र; मांडले हे मुद्दे