वर्धा - किसान अधिकार अभियानच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मंगळवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शेताचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासह दिवसाला 12 तास वीज उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पालकमंत्र्यांसह निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील आंदोलकांनी दिला.
हेही वाचा - 'चंपक चाचा'ने मागितली राज ठाकरेंची माफी, 'तारक मेहता' टीमच्या गोटात भूकंप
जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतात सिंचनासाठी जावे लागते. यावेळी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी जखमी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. घाम गाळून अथक मेहनतीतून पिकवलेले पीक वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केल्याचेही प्रकार घडले आहे. हे टाळण्यासाठी वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासह शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात यावी, ही मागणी आंदोलकांनी केली.