वर्धा - हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्राध्यापिकेला निर्घृणपणे जिवंत जाळणाऱ्या आरोपीच्या न्यायालयीन कोठडीत तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. प्रभारी जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एम. मिश्रा यांनी आरोपी विकेश नगराळेच्या न्यायालयीन कोठडीत 12 मार्चपर्यंत वाढ केलेली आहे.
पोलिसांच्या वतीने 25 फेब्रुवारीला दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, अद्याप या प्रकरणी न्यायालयात चार्जशीट उघडली नसल्याने यावर सुनावणीला सुरुवात झाली नाही. यात या प्रकरणात पोलीसांना केवळ साक्ष पुरावे, आरोपीला गरज पडल्यास न्यायालयात हजर करणे ही कामे असून पुढील प्रक्रिया आता न्यायालयाच्या वतीने केली जाणार आहे. हे प्रकरण हिंगणघाट येथील दिवाणी फौजदारी न्यायालयानंतर आता जिल्हा सत्र न्यायालयातमध्ये दोषारोपपत्र उघडून पुढील प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. यात 426 पानांचे दोषारोपपत्र उघडले जाईल त्यानंतर वाचन आणि नंतर सुनाववणी होईल, अशी माहिती पुढे येत आहे. यात पोलिसांनी गतीने तपास घेत अवघ्या 5 दिवसात आरोपीकडून पुरावे गोळा केले. तसेच प्रकरणाच्या 26 दिवसात चार्जशीट दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
हेही वाचा - मुलामुळे आईची ओळख व्हावी असे वाटते, रोहितने माझे ते स्वप्न पूर्ण केले - सुनंदा पवार
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांच्या नावाची घोषणा राज्य सरकारच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. यामुळे या प्रकरणात पीडितेच्या वतीने पाहिल्या दिवशी काय काय सुनावणी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, किसान अभियानचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे