ETV Bharat / state

दागिन्याच्या दुकानात चोरी; चार लाखाचे चांदीचे दागिने लपास, मात्र 40 लाखाचे सोन वाचले

author img

By

Published : Aug 9, 2019, 6:17 AM IST

दुकानाचे लोखंडी गेट तोडून चोर आत शिरले होते. त्यांना दुकानाच्या शोकेसमध्ये ठेवलेले चार लाखांचे चांदीचे दागिने मिळविण्यात यश आले. मात्र त्यांना सोन ठेवलेली तिजोरी फोडता न आल्याने चाळीस लाखाचे सोन वाचले.

दागिन्याच्या दुकानात चोरी

वर्धा- कारंजा शहरातील गवंडी रस्त्यावरील चौधरी ज्वेलर्स या दुकानातून चोरट्यांनी 4 लाखाचे चांदीचे दागिने लपास केले आहे. ही घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत पाच चोरट्यांचा समावेश असून ते परिकरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

चौधरी ज्वेलर्स या दुकानातून चोरट्यांनी 4 लाखाचे चांदीचे दागिने लपास केले

दुकानाचे लोखंडी गेट तोडून चोर आत शिरले होते. त्यांना दुकानाच्या शोकेसमध्ये ठेवलेले चार लाखांचे चांदीचे दागिने मिळविण्यात यश आले. मात्र त्यांना सोन ठेवलेली तिजोरी फोडता न आल्याने चाळीस लाखाचे सोन वाचले. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने दुकानाच्या मालकाने याबाबत पोलिसात तक्रार दिली असता त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली. दुकानात सीसीटीव्ही होते, पण चोरट्यानी सीसीटीव्ही तोडून नेले. त्याचबरोबर ते रेकॉर्डींग हार्डीक्स सुद्धा घेऊन पसार झाले. यावेळी चोरट्यांनी लपास केलेल्या 4 लाखांच्या दागिण्यांमध्ये चांदीची पैंजण, अंगठ्या, हार यासह चांदी निर्मित इतर दागिण्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही हार्डीस्क जरी चोरून नेली असली, तरी परिसरातील इतर सिसिटीव्हीमध्ये त्यांची हालचाल कैद झाली आहे. याच मार्गावर असलेल्या कोंढाळी परिसरात रात्रीच्या सुमारास दोन दुकाने फोडण्यात आली होती. या घटने मागे याच चोरट्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मागील काही दिवसांपासून कारंजा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. आता चक्क दागिन्याचे दुकान फोडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कारंजा पोलिसांनी सतर्कता बाळगत याकडे लक्ष देऊन चोरट्यांना जेरबंद करावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

Intro:
दागिन्यांच्या दुकानात चार लाखाची चांदीची चोरी, पण चाळीस लाखाचे गहाण सोनं वाचले

वर्धा- कारंजा शहरातील गवंडी रस्त्यावरील चौधरी ज्वेलर्स दुकानात गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या दरम्यान दुकानाचे लोखंडी गेट तोडून दुकानात चोरट्यानी हात साफ केले. या चोरीची घटनेत पाच चोरट्याचा समावेश असून चोर तसेच कार सिसिटीव्ही मधे कैद झाली आहे. या चोरीमध्ये दुकानाच्या शोकेसमध्ये असलेली चार लाखाची चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. सुदैवाने सोनं ठेवलेली तिजोरी न फुटल्याने चाळीस लाखाचे सोनं मात्र वाचल.

आज सकाळी ही घटना उघडकीस आल्याने दुकानाचे मालक यांनी पोलिसात तक्रार दिली असता चौकशी करण्यात आली. दरम्यान दुकानात सीसीटीव्ही होते. पण यात चोरट्यानी
चौधरी ज्वेलर्समधील असलेले सिसिटीव्ही तोडून नेले तसेच रेकॉर्डिंग हार्डीक्स घेऊन पसार झाले. यावेळी दुकानात शोकेसमध्ये असलेली चांदीचे पैंजण, अंगठ्या हार यासह चांदीचा तयार असलेले पूर्ण साहित्य ज्याची जवळपास चार लाख रुओए किमती असल्याचे सांगितले जात आहे. याच वेळी दुकानात 40 लाखाचे सोन सुद्धा होते. सुदैवाने हे सोने दुकानातील लॉकरमध्ये होते. पण दुकानातील लॉकर चोरट्यांना न तुटल्याने गहाण असलेले चाळीस लाखाचे सोने वाचले.

या चोरट्यानी दुकानातील सीसीटीव्ही हर्डीस्क जरी चोरून नेली असली तरी शहरातील एका सिसिटीव्ही मध्ये चोरट्याच्या हालचाली कैद झाली आहे. याच मार्गावरील रात्री कोंढाळी परिसरात दोन दुकाने फोडली गेली असून हेच चोरटे असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मागील काही दिवसांपासून कारंजा पोलीस स्टेशन आनंतर्गत अनेक चोरीच्या घटना नोंद करण्यात आल्या आहे. आता चक्क ज्वेलर्स दुकान फोडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय माहामार्गवर रास्तालगत हे शहर असल्याने पेट्रोलिंगची गरज आहे. मात्र यात साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे कारंजा पोलिसानी सतर्कता बाळगत याकडे लक्ष देऊन चोरट्याना जेरबंद करून कारंजा वासीयांना भीतीच्या वातावरणातून मुक्त करण्याची मागणी होत आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.