ETV Bharat / state

वर्धा-पुलगाव मार्गावर जीपची ट्रकला धडक.. तिघांचा मृत्यू - वर्धा जीप अपघात बातमी

जीप नागपूरच्या दिशेने जात होती. दरम्यान निमगाव परिसरात जीपने ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात एकढा भीषण होता की, जीपची समोरची बाजू पूर्ण ट्रकमध्ये घुसली. या अपघातातील मृत्यूपैकी दोघे वाशिम जिल्ह्यातील पारडी येथील तर एक जण उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील आहे.

jeep-hits-truck-on-wardha-pulgaon-road-3-dead
वर्धा-पुलगांव मार्गावर जीपची ट्रकला धडक..
author img

By

Published : Jul 22, 2020, 7:17 PM IST

वर्धा - वर्धा-पुलगाव मार्गावर रात्रीच्या सुमारास भरधाव जीप आणि ट्रकचा अपघात झाला. भरधाव जीपने ट्रकला दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अमोल तिखे, अमोल शिंदे आणि अभिषेक त्रिपाठी असे मृत व्यक्तींचे नावे आहेत. जीपमधील तिघे समृद्धी महामार्गाच्या निर्माण कार्यात कार्यरत असून नागपूरला एअरपोर्टकडे जात होते.

जीप (क्रमांक एमएच 37, व्ही- 4690) नागपूरच्या दिशेने जात होती. दरम्यान, निमगाव परिसरात जीपने ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात एकढा भीषण होता की, जीपची समोरची बाजू पूर्ण ट्रकमध्ये घुसली. या अपघातातील मृत्यूपैकी दोघे वाशिम जिल्ह्यातील पारडी येथील तर एक जण उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील आहे. घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.

घटनेचा पुढील तपास ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांच्या मार्गदर्शनात प्रकाश निमजे करत आहेत. या प्रकरणात चुकीच्या दिशेने भरधाव वाहन चालवत असल्याने अमोल तिखेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वाहन चालवताना ओव्हरटेक करताना हा अपघात झाला असल्याची माहिती ठाणेदार रेवचंद सिंगंजुडे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.