वर्धा - होमगार्ड महिलेने पिपरी मेघे येथील पोलीस वसाहतीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या खोली समोरच स्वतःच्या ( Police Burnt Herself In Wardha ) अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी संध्याकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घटना घडली असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला सेवाग्राम रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. या महिलेने स्वत:ला का पेटवून घेतले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नेमकं काय घडलं? -
पिपरी मेघे येथील पोलीस वसाहतीमध्ये 'शरद' नामक इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर स्थानिक गुन्हे शाखेलाला कार्यरत पोलीस शिपाई नवनाथ मुंडे राहतात. त्याच्याच घराच्या दरवाज्यापुढे महिला होमगार्डने स्वतःच्या अंगारावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. आरडाओरड आणि धूर दिसल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांना महिलेने पेटवून घेतल्याचे दिसले. नागरिकांनी तत्काळ तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पण महिला 60 ते 70 टक्के जळाल्याने महिलेला गंभीर अवस्थेत डॉक्टरांनी नागपूरला रेफर केले आहे.
हेही वाचा - Corona Restrictions In Maharashtra : मंत्रालयाचा कारभार पुन्हा ५० टक्क्यांवर, दोन शिफ्टमध्ये होणार कामकाज