ETV Bharat / state

वर्ध्यात जोरदार पाऊस; पीकाच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत

मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. दोन चालू असलेल्या पावसाने नदी, नाले ओसंडून वाहत होते. यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसेच खोलगट भागातील शेती जलमय झाल्याने पीकांचे नुकसान झाले आहे.

वर्ध्यात जोरदार पाऊस
author img

By

Published : Sep 5, 2019, 2:57 AM IST

वर्धा - मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. दोन चालू असलेल्या पावसाने नदी, नाले ओसंडून वाहत होते. यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसेच खोलगट भागातील शेती जलमय झाल्याने पीकांचे नुकसान झाले आहे.

वर्ध्यात जोरदार पाऊस; पीकाच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत

हेही वाचा - चोविस तासानंतर वणा, वर्धा नदीच्या संगमावर मिळाला अभयचा मृतदेह, दोघींचा शोध सुरू

आर्वी, आष्टी, समुद्रपूर, सेलू, आणि वर्धा या भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आलेत. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे बाकळी नदीला पूर आला आहे. तसेच वर्धा मनेरी येथील पुलावरून पाणी वाहील्याने राष्ट्रीय महामार्गावरील तळेगावकडून येणारी वाहतूक एक ते दीड तास बंद राहिली. शहरातील अनेक भागात पाणी साचले तसेच गाव खेड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आष्टी तालुक्यात जोरादर पाऊस सकाळपासून बरसला. याचा फटका म्हणून गावाला जोडणारे छोट्या पुलावरून पाणी असल्याने संपर्क तुटला तसेच अंतोरा येथील 10 ते 15 घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले. तसेच आष्टी वरुड मार्गाचे काम सुरू असल्याने छोटे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद होती.

हेही वाचा - पोलीस अधिकारी व बस चालकात वाद; तब्बल तीन तास वाहतूक ठप्प

समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असल्याने लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासह मंगरूळ पिपरी गावात पाणी शिरले. गाव नद्या भरून वाहत असल्याने रासा, घोणसा, पिपरी गावाचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट उमरेड मार्गावरील खापरी नाल्याला पूर आल्याने वडगावात पाणी शिरले, सांवगी सायगव्हान मार्ग बंद पडला. वाघोडा नदीला पूर आल्याने वायगाव गोंड रस्त्यावरी गावाचा संपर्क तुटला आहे. शेत शिवार जलमय झाल्याने पाण्याखाली येऊन पिकाचे मोठ्या प्रमाणात पीकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा -'धाम' ओव्हरफ्लो, बाप्पांनी केले जलसंकट दूर

सेलू तालुक्यातही हीच परिस्थिती पाहयाला मिळाली. पावसाचा फटका बसला. खापरी येथील उच्च प्राथमिक शाळेत गुडघाभर पाणी भरल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. एकंदर जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले. तेच छोटे छोटे पुलाच्यावर पाणी वाहून गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे अनेक चित्र पहावयास मिळाले. यामुळे पाणी पातळीत वाढ झाली. काही भागात पिकांना फायदाही झाला. मात्र शेत शिवारात पाणी साचल्याने पिकांना फटकाही बसला.

Intro:वर्धा
mh_war_03_paus_nuksan_vis1_7204321

वर्ध्यात सर्वत्र पाऊस, नदी नाले ओसंडून वाहले, वाहतुकीवर परिणाम

जिल्ह्यात सर्वत्र पावसाने झोडपून काढल्याचे चित्र दिसून आले. आर्वी आष्टी समुद्रपूर सेलू वर्धा या भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आलेत. या पावसाने सर्वच भगत साधारण एक ते दोन तास चांगलेच झोडपून काढले. अनेक नदी नाल्याने पूर आल्याने ओसंडून वाहू लागले. यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम सुद्धा झाला. तसेच खोलगट भागात शेती असल्याने शेत शिवार जलमय झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे.

वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गावं नाले नद्या यासह बाकळी नदीला पुर आला. यासह वर्धा मनेरी येथिल पुलावरून पाणी वाहत गेल्याने राष्ट्रीय महामार्गावरील तळेगांवकडून येणारी वाहतूक एक ते दीड तास बंद राहिली. शरहारातील अनेक भागात पाणी साचले तसेच गाव खेळातील जण जीवन विस्कळीत झाले.

आष्टी तालुक्यात जोरादर पाऊस सकाळपासून बरसला. याचा फटका म्हणून गावाला जोडणारे छोट्या पुलावरून पाणी असल्याने संपर्क तुटला तसेच अंतोरा येथील 10 ते 15 घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले. तसेच आष्टी वरुड मार्गाचे काम सुरू असल्याने छोटे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद राहिली.

समुद्रपूर तालुक्यात पावसाचा चांगलाच कहर पाहायला मिळाला. काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला. याचा फटका जण जीवन विस्कळीत होऊन दैनंदिन कामावर पडला. लाल नाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असल्याने लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासह मंगरूळ पिपरी गावात पाणी शिरले. गाव नद्या भरून वाहत असल्याने रासा, घोणसा, पिपरी गावाचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट उमरेड मार्गावरील खापरी नाल्याला पूर आल्याने वडगावात पाणी शिरले, सांवगी सायगव्हान मार्ग बंद पडला. वाघोडा नदीला पूर आल्याने वायगाव गोंड रस्त्यावरी गावाचा संपर्क तुटला आहे. शेत शिवार जलमय झाल्याने पाण्याखाली येऊन पिकाचे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

सेलू तालुक्यातही हीच परिस्थिती पाहयाला मिळाली. पावसाचा फटका बसला. खापरी येथील उच्च प्राथमिक शाळेत गुडघाभर पाणी भरल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच अनेक शहरातील नगर पंचायत असो खोलगट भागात पाणी शिरल्याने तळ्यांचे स्वरूप पाहायला मिळाले.

एकंदर जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले. तेच छोटे छोटे पुलाच्यावर पाणी वाहून गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे अनेक चित्र पहावयास मिळाले. यामुळे पाणी पातळीत वाढ झाली. काही भागात पिकांना फायदाही झाला. मात्र शेत शिवारात पाणी साचल्याने पिकांना फटकाही बसला. शेतकऱ्यांच्या घरात काही ठिकाणी खुशी तरी काही ठिकाणी नुकसानीने डोळ्यात पाणी वाहले....
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.