वर्धा - जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातील कारंजा तालुक्याच्या पंचायत समिती इमारतीतील 98 क्रमांकच्या बुथवर सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. महिला मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी या मतदान केंद्राची संकल्पना निवडणूक विभागाकडून राबवली गेली. यावेळी एका दिव्यांग महिलेनेही या मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. दिव्यांग असूनही त्यांनी मतदानाला प्राधान्य देत जे मतदार मतदान करण्यासाठी आळस करतात अशांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे. यावेळी मतदान केंद्रवरील सखींनी त्यांना मतदान करण्यासाठी सहकार्य केले.
निवडणुकीत महिलांचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक विभागाकडून सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राची आकर्षक अशी सजावही करण्यात आली होती. जिल्ह्याच्या चार विधानसभा मतदारसंघासाठी 1314 मतदान केंद्रावर मतदान सुरु होते. जिल्ह्याच्या चारही विधानसभेमध्ये प्रत्येकी 2 अशाप्रकारे 8 सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. या मतदान केंद्रावर महिलांनी पूर्णपणे जवाबदारी सांभाळत महिलांना सन्मान आणि प्रेरणा देण्याचे काम यातून करण्यात आले.
हेही वाचा - देवळी मतदारसंघात रामदास तडस यांचे सहकुटुंब मतदान
लोकसभा निवडणुकीपासून ही संकल्पना राबली जात आहे. यात मतदान केंद्रावर येणाऱ्या महिलांची संख्या पाहता ही ससंकल्पणा यशस्वी होताना दिसून येत आहे. सखी मतदान केंद्रावर महिलांना आपल्या सारखे वाटावे अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली होती.
हेही वाचा - वर्ध्यात मतदानावर पावसाचे सावट, दोन मैत्रिणींनी केले मतदान