ETV Bharat / state

वर्ध्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या विरोधात ग्रामसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

क्रांतिकारी शेतकरी-शेतमजूर संघटनेच्या विरोधात ग्रामसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याची मागणी केली.

author img

By

Published : Jul 3, 2019, 11:56 PM IST

मंदा ठवरे

वर्धा - क्रांतिकारी शेतकरी-शेतमजूर संघटनेच्या विरोधात ग्रामसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याची मागणी केली. याला उत्तर देत संघटनेच्या अध्यक्षा मंदा ठवरे यांनी हिंगणघाट समुद्रपूर सिंदी रेल्वे अंतर्गत येणाऱ्या ग्रामसेवकांवर ग्रामसभा घेत नसल्याचा आणि इतर अनेक आरोप केले.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षा मंदा ठवरे

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने महिलांमध्ये जनजागृतीचे काम केले जात आहे. यामुळे महिला आता खर्चाचा हिशोब मागत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर अनेक योजना शासनाच्या वतीने राबविल्या जात आहे. यात सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यांना डावलले जात आहे. जवळच्या लोकांना लाभ मिळवून देण्याचे काम हिंगणघाट उपविभागात सुरू आहे. यासाठी महिलांमध्ये जागृती करून त्याना हक्काचा जाब विचारण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन काम सुरू आहे. याचा धसका घेत अनेकजण आमच्यावर खोटे आरोप करत असल्याचे ठवरे यांनी सांगितले.

दुसरीकडे ग्रामसेवकांच्या वतीने ठवरे या महिलांना भडकवत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. या आरोपाचे खंडन करत ठवरे यांनी ग्रामसभा हा गावकऱ्यांचा अधिकार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून महिला जागृत होत जाब विचारत असल्याने ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे म्हटले. लोकांना घरकुल आणि शौचालय याचा लाभ मिळत नाही. याच्या विरोधात महिला जाब विचारत असल्याने महिलांना पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत ठवरे यांनी केला. तसेच गरज पडल्यास जिल्हा परिषदे समोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा दिला.

Intro:ग्रामसभेत खर्चाचा हिशोब द्या नाहीतर आंदोलन करू

- क्रांतिकारी शेतकरी शेतमजूर संघटनेचा ग्रामसेवक अन्याय करत असल्याचा आरोप
- शासकीय योजनांची माहिती, तथा हिशोब विचारल्यास ग्रामसेवक देत नासल्याचा आरोप
- वेळ पडल्यास आंदोलनाचा इशारा

वर्ध्यात क्रांतिकारी शेतकरी व शेतमजूर संघटनेच्या विरोधात ग्रामसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याची मागणी केली. यालाच उत्तर देत संघटनेच्या अध्यक्षा मंदा ठवरे यांनी हिंगणघाट समुद्रपूर सिंदी रेल्वे अंतर्गत येणाऱ्या ग्रामसेवकांवर आरोप करत ग्रामसभा न घेतल्यास जिल्हा परिषदेच्या समोर उपोषणावर बसण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून दिला.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने महिलांमध्ये जनजागृतीचे काम केले जात आहे. यामुळे महिला आता खर्चाचा हिशोब मागत आहे. अनेक ग्रामपंचयात स्तरावर योजना शासनाच्या वतीने राबविला जाते. यात सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यांना डावलले जात आहे. जवळच्या लोकांना लाभ मिळवून देण्याचे काम हिंगणघाट उपविभागात सुरू आहे. यासाठी महिलांमध्ये जागृती करून त्याना हक्काचा जाब विचारण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून गावो गावी जाऊन काम सुरू आहे.

याचा धसका घेत अनेकजण खोटे आरोप करत असल्याचे मंदा ठवरे यांनी केला. तेच ग्रामसेवकांच्या वतीने या महिलांना भडकवत असल्याचा आरोप ग्रामसेवकांनी एका तक्रारीत जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केला. या आरोपाचे खंडन करत त्यांनी ग्रामसभा हा गावकऱ्यांनाचा अधिकार आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून महिला जागृत होत जाब विचारत असल्याने ग्रामसभा घेण्यास टाळा टाळ केली जात असल्याचे म्हटले. लोकांना घरकुलचा शौचालय याचा लाभ मिळत नाही आहे. याचा विरोधात महिला जाब विचारत असल्याने महिलांना पोलीस स्टेशनच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला. तसेच या पुढे अन्याय सहन न करता गरज पडल्यास जिल्हा परिषदे समोर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा देण्यात आला.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.