वर्धा - महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त सर्व सेवा संघ आणि गांधीवादी संघटना देशातील १५० ठिकाणी एक दिवसाचा उपवास करणार आहेत. लोकतंत्राची रक्षा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मुद्दा या उपवासाच्या माध्यमातून मांडणार आहे. हीच महात्मा गांधींना श्रद्धांजली असेल असे सर्व सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव विद्रोही म्हणाले.
हे ही वाचा - गांधीजी @ १५०: ईटीव्ही भारतने लॉंच केलेल्या विशेष गीताचे पियूष गोयल,व्यंकय्या नायडूंकडून कौतुक
लोकतंत्राचे रक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा या उपवासाचा मुख्य उद्देश ठेवला असून देशभरातील 150 ठिकाणांची यासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच गांधीजींची अहिंसेची विचारधारा अधिका अधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचाही उद्देश आहे. देश अहिंसेमुळे कमजोर झाला असे गांधी विरोधी विचारधारेचे लोक टीका करतात. मात्र, अहिंसा हा देशाच्या विकासाचा शाश्वत विचार असल्याचे मत विद्रोही यांनी व्यक्त करत गांधीं विरोधी विचारांना थांबवण्याची गरज व्यक्त केली.
हे ही वाचा - ईटीव्ही भारतच्या माध्यमातून देशातील सर्वश्रेष्ठ गायकांकडून बापूंना संगीतमय श्रद्धांजली