वर्धा - जिल्ह्यात आज 4 कोरोनााग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीने कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 83 वर जाऊन पोहोचली असून सक्रिय (अॅक्टिव्ह) रुग्ण 37 वर पोहचली आहेत.
वर्ध्यात आज चार जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. यात शहरातील टिळक चौकातील दोन महिला वय 54 वर्ष, 28 वर्ष तसेच कारंजा तालुक्यातील काकडा येथील दोन वृद्ध पुरुष वय 70 व 74 वर्षे यांचे कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. त्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह झाला आहे. यापूर्वी काकडा गावात 10 जण पॉझिटिव्ह आले असून गावातील बधितांची संख्या 12 झाली आहे. यात टिळक चौकातील 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सेवाग्राम रुग्णालयात दाखल महिलेला मधुमेह, उच्च रक्तदाब, थायराईड आजाराने ग्रस्त होती.
आजच्या कोरोना बाधित रुग्णासहित जिल्ह्यात एकूण रुगणांची संख्या 83 झाली असून 44 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तसेच सक्रिय रुग्णांची संख्या 37 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 हजार 720 कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 6 हजार 579 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 6 हजार 469 निगेटिव्ह तर 83 पॉझिटिव्ह आहेत, तसेच 141 अहवाल प्रलंबित आहेत. आज 177 स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून आयसोलेशन मध्ये 187 व्यक्ती आहेत.
वर्ध्यात चार नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर, एका महिलेचा मृत्यू - वर्धा कोरोना आकडेवारी
जिल्ह्यात आज चार नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली असून बाधितांचा एकूण आकडा 83 वर पोहोचला आहे.