ETV Bharat / state

आगीत होरपळून ५ जनावरांचा मृत्यू; काही जनावरं जखमी, चाराही जळून खाक

ही आग सुरुवातीला गावठाणावर दुपारच्या वेळी लागली. वर्षभरासाठी साठवून ठेवलेल्या वैरणीवर आगीची ठिणगी पडली असावी आणि त्यातून ही प्रचंड आग लागल्याचा अंदाज आहे.

author img

By

Published : Apr 20, 2019, 11:13 AM IST

आगीत पाच जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही जनावर जखमी झाली आहेत.

वर्धा - आष्टी तालुक्यातील पारडी येथे गावाच्या वेशीवर असलेल्या वैरणीला (जनावरांचा चारा) शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. येथे बांधलेल्या ५ जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर १० ते १२ जनावरे आगीत गंभीर भाजली आहेत. अग्निशामकच्या साहाय्याने लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तोपर्यंत, काही जनावरे दगावली. या घटनेने काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ही आग सुरुवातीला गावठाणावर दुपारच्या वेळी लागली. वर्षभरासाठी साठवून ठेवलेल्या वैरणीवर आगीची ठिणगी पडली असावी आणि त्यातून ही प्रचंड आग लागल्याचा अंदाज आहे. या आगीने उग्र रूप धारण केले आणि लगतच्या गोठ्यात जाऊन पोहचली. यामुळे खुंट्याला बांधून असलेली जनावरे आगीचे लोळ पोहचताच हंबरडा फोडू लागली. काही जनावरे भाजली गेल्याने खुंटा तोडून पळत रानाकडे गेली. तर पाच जनावरं होपळून दगावली.

गावातील लोकांना आगीची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा मारा सुरू झाला. पण मोठ्या प्रमाणात वैरण साठवून ठेवले असल्याने आगीने सगळे वैरण कवेत घेत रौद्र रूप धारण केले. आष्टी तसेच आर्वी येथील अग्निशाम बंब बोलवून पाण्याचा मारा करण्यात आला. तळेगाव पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला.

उन्हाळा लागताच आगीच्या घटनेत वाढ

उन्हाळा सुरू झाला की तापमानात प्रचंड वाढ होते. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. या दिवसात छोटीशी ठिणगी मोठे उग्र रुप धारण करू शकते. खासकरून जनावरांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी. दोन वर्षांपूर्वी कारंजा तालुक्यातील अशाच एका आगीत ३५ ते ४० दुधाळ जनावरे दगावली. यात शेतकऱ्याचे दुधाळ जनावर मरण पावल्याने प्रचंड नुकसान सोसावे लागले होते.

* या शेतकऱ्यांचे झाले नुकसान

- या आगीत दिनबाजी सयाम यांचा एक बैल एक गाय होरपळून दगावले. तर चार जनावरे भाजली गेल्याने जखमी झाली आहेत.

- नामदेव डोमजी कोडपे यांनी जनावरांसाठी ठेवलेले १४ गोने कुटार जळाले आहेत. सोबत लाकडी बंडी गोठ्यातील शेतीचे साहित्य जळून खाक झाले.

- किसनाजी डोमजी मरसकोल्हे यांचे १० गोने कुटर आगीत कोळसा झाले.

- मुकींदा हरिभाऊ चाफले यांची ३ जनावरे दगावली आहेत. यात २ गायींचा आणि एका वासराचा समावेश आहे. शेतीचे साहित्य बैलजोडी जखमी झाली.

- शिवराम भलावी यांचा १० गोने कुटार जनावरांचा चारा जळाला. मोहन चाफले यांचा गोठा, शेतीच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. यात जखमी जनावरांना कारंजा येथील पशु पर्यवेक्षक प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी पोहचून उपचार केले.

Intro:R_MH_19_APR_WARDHA_AAG_VIS_1

आगीत होरपळून पाच जनावरांचा मृत्यू, तर काही जनावर जखमी, वैरणही जळून खाक

वर्धा - आष्टी तालुक्यातील पारडी येथे गावाचा वेशीवर असलेल्या वैरणाला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. इथे बांधून असलेली 5 जनावरे आगीने होरपळून मेली. तर 10 ते 12 जनावर आगीत गंभीर भाजल्या गेली. अग्निशामकच्या साह्याने लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तोपर्यंत मात्र काही जनावरे दगावली. या घटनेने काही शेतकऱ्याचे मोठे नुकसान सोसावे लागले.

ही आग सुरवातीला गावठाणावर कोणी नसतांना दुपारच्या वेळी लागली. वर्षभरासाठी करून ठेवलेल्या वैरणावर आगीची ठिणगी पडली असावी. त्यातूनच ही प्रचंड आग लागली. या आगीने उग्र रूप धारण करत लगतच्या गोठ्यात जाऊन पोहचली. यामुळे खुट्याला बांधून असलेली जनावरे आगीच्या लोळ पोहचताच हंबरडा फोडू लागली. काही जनावरे भाजल्या गेल्याने खुटा तोडून पळत रानाकडे गेल्या. तर पाच जनावरांनाचा होपळून दगावली.

गावातील लोकांना कळताच घटनासाठी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा मारा सुरू झाला. पण मोठ्या प्रमाणात वैरण साठवून ठेवले असल्याने आगीने सगळे वैरण कवेत घेत रौद्र रूप धारण केले. आष्टी तसेच आर्वी येथील अग्निशाम बंब बोलवून पाण्याचा मारा करण्यात आला. तळेगांव पोलिसानी घटनेची नोंद करत तपास सुरू केला.

उन्हाळा लागताच आगीच्या घटनेत होतात वाढ, काळजी घेणे गरजेचे####

उन्हाळा सुरू झाला की तापमानात प्रचंड वाढ होते. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. या दिवसात छोटीशी ठिणगी मोठे उग्र रुप धारण करू शकते. खासकरून जनावरणाच्या बाबतीत विशेष काळजी घावी. दोन वर्षांपूर्वी कारंजा तालुज्यातील अशाच एका आगीत 35 ते 40 दुधाळ जनावरे दगावली. यात शेतकऱ्याचे दुधाळ जनावर मरण पावल्याने प्रचंड नुकसान सोसावे लागले होते.

कोणी काय गमावले 'आगीत'######

यात दिनबाजी सयाम यांचा एक बैल एक गाय होरपळून दगावले.तर चार जनावरे भाजल्या गेल्याने जखमी झाली.

- नामदेव डोमजी कोडपे यांनी जनावरांसाठी 14 गोने घेऊन ठेवलेले कुटार जळाले. सोबत लाकडी बंडी गोठ्यातील शेतीचे साहित्य जळून खाक झाले.
- किसनाजी डोमजी मरसकोल्हे यांचे 10 गोने कुटर आगीत कोळसा झाले.

- मुकींदा हरिभाऊ चाफले यांचे 3 जनावरे दगावली. यात 2 गायीचा एक वासराचा समावेश आहे. शेतीचे साहित्य बैलजोडी जखमी झाली.

- शिवराम भलावी 10 गोने कुटार जनावरांचा चारा जळाला. मोहन चाफले यांच्या गोठा, शेतीचे साहित्याचे नुकसान झाले. यात जखमी जनावरांना कारंजा येथील पशु पर्यवेक्षक प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी पोहचून उपचार केले. Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.