वर्धा - देवळी येथे एसएमडब्ल्यू इस्पात प्रायव्हेट (महालक्ष्मी स्टील) प्लांटमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत वर्चुअली उदघाटन पार पडले. दररोज 500 सिलिंडर निर्मितीची क्षमता असून सध्या 150च्या जवळपास सिलिंडर निर्मिती होत आहे. वर्धा जिल्ह्याला प्रथम प्राधान्य देत वैद्यकीय कारणांसाठी निःशुल्क ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करणारे मिशन 'ऑक्सिजन स्वावलंबन' अंतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
पाहिली खेप प्रशासनाला रवाना
या प्लॅन्टच्या लोकार्पण प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याचा मोठा फायदा रुग्णांना होणार आहे. यातून अनेकांना रुग्णाची ऑक्सिजनची गरज भागवली जाणार असून लोकांचे जीव वाचवण्यास मदत होणार आहे. यामुळे हा प्रकल्प महत्वाचा मनाला जात आहे. या प्लॅन्टमधून पहिली ऑक्सिजन सिलेंडरची खेप हे जिल्हा प्रशासनाला सोपवण्यात आली आहे. उदघाटनानंतर पहिली खेप हे आमदार रणजित कांबळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हे ऑक्सिजन सिलेंडरची पहिली खेप रवाना झाली आहे.
औद्योगिक वसाहतीत उभारला पहिला ऑक्सिजन प्लान्ट; नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण - wardha latest news
वर्ध्याच्या देवळी येथील ऑक्सजिन प्लँट किंवा त्यासाठीचे साहित्या बनवण्याची जवाबदारी बंगलोरच्या ऑक्सिजन जनरेशन लिमिटेड कंपनीला दिली होते. या कंपनीने ऑक्सिजन प्लॅन्टचे मशिनरी आणि साहित्य दुबईला पाठवण्यासाठी बनवले होते. ऑक्सिजन प्लॅन्ट 21 दिवसांत उभा राहिला असून देशातील राज्यातील पहिला औद्योगिक वसाहतीतील हा ऑक्सिजन प्लँट ठरला आहे.
![औद्योगिक वसाहतीत उभारला पहिला ऑक्सिजन प्लान्ट; नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण oxygen plant](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11799981-931-11799981-1621305852993.jpg?imwidth=3840)