ETV Bharat / state

ज्वारीची फुटवा खाल्ल्याने १५ गाईंचा मृत्यू - pachpavali

ज्वारीची फुटवा खाल्ल्याने गाईंना विषबाधा झाल्याची घटना तळेगांव शामजीपंत येथील पाचपावली पांधन शिवारात घडली. यामध्ये १५ गाईंचा मृत्यू झाला आहे.

ज्वारीची फुटवा खाल्ल्याने १५ गाईंचा मृत्यू
author img

By

Published : Jun 9, 2019, 3:21 AM IST

वर्धा - ज्वारीची फुटवा खाल्ल्याने गाईंना विषबाधा झाल्याची घटना तळेगांव शामजीपंत येथील पाचपावली पांधन शिवारात घडली. यामध्ये १५ गाईंचा मृत्यू असून, काही गायींची प्रकृती गंभीर आहे.

गावात मोरेश्वर मुरके हा गुराखी गाई चारण्यासाठी घेऊन गेला होता. पाचपावली पांधन शिवारातील दुर्गेंच्या शेतात गाई चरत होत्या. यावेळी अचानक एका मागून एक गाय जमिनीवर लोळताना दिसली. जवळ जाऊन पाहिले असता गायींचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले.

ज्वारीची फुटवा खाल्ल्याने १५ गाईंचा मृत्यू

ग्रामस्थांनी तत्काळ सरकारी पशुवैदकीय दवाखान्यातील डॉक्टरांना माहिती देत घटनास्थळी आणले. यावेळी तपासणी करत उपचाराला सुरवात केली. मात्र, तोपर्यंत १५ गाईचा मृत्यू झाला होता. कळपात एकूण २२ गाई होत्या. उर्वरित गाईंची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Intro:तळेगावात ज्वारीच्या फुटवा खाल्ल्याने पंधरा गाईचा मृत्यू

- काही गाईंची प्रकृती गंभीर
वर्धा जिल्ह्याच्या तळेगांव शामजीपंत येथील पाचपावली पांधन शिवारात ज्वारीच्या फुटवा खाल्याने गाईंना विषबाधा झाली आहे. यात पंधरा गाईं दगावल्या आहे. तर काही गाईंची प्रकृती गंभीर आहे. नेहमीप्रमाणे गावातील गाईंचे गोव्हन पाचपावली पांधन चराई सुरू असताना गायी अचानक मरण पावल्याने बाब उघडकीस आली.

गावात मोरेश्वर मुरके नामक गुराखी गाई चाराईसाठी घेऊन गेला. पचपावली पांधन शिवारातील दुर्गे यांच्या शेतात गाई चरत होत्या. यावेंळी अचानक एक मागून एक गाय जमिनीवर लोडताना दिसली. जवळ जाऊन पाहिले असता गायींचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. घाबरलेल्या स्थितीत त्याने ग्रामस्थांना माहिती दिलीय.

सरकारी पशुवैदकीय दवाखाना गाठत ग्रामस्थांना डॉक्टरांना माहिती देत घटनास्थळी घेऊन गेले. यावेळी तपासणी करत उपचाराला सुरवात केली. मात्र तोपर्यंत पंधरा गाईचा मृत्यू झाला. कळपात एकूण २२ गाई होत्या उर्वरित गाईंची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याचावर उपचार करण्यात आला.

ज्वारीचा फुटवा खाल्याने विषबाधा होऊ गायी दगावण्याची अनेक घटना या हंगामात उघडकीस आल्यात. विशेष म्हणजे काही कळेपर्यंत गायी दगवत असल्याने गोधन पालक धास्तावले आहे. यामुळे आज 15 गायीचा मृत्यू झाल्याने दुग्धव्यवसायवर परिमाण होत आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.