वर्धा - हिंगणघाट शहरात धक्कादायक घटना घडली याचा सर्वत्र निषेध होत आहेत. दिवसागणिक वाढते महिलांवरचे अत्याचार पाहता महिला संतप्त झाल्या आहेत. पीडित तरुणी ही मातोश्री आशाताई कुणावर महाविद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत होती. याच शाळेच्या सहकारी महिला शिक्षिकेने त्या आरोपीला कठोर शिक्षा होण्याची मागणी ई टीव्ही भारतशी बोलताना व्यक्त करून दाखवली.
या प्रकरणात काहींनी तर आरोपीवर हैदराबाद पोलिसांप्रमाणे कारवाई करा. त्याने त्या शिक्षिकेला दिलेल्या वेदना त्यालाही झाल्या पाहिजेत, अशी शिक्षा द्यावी अशी मागणी केली. त्याला फाशी द्यावी अशी सुध्दा मागणी करण्यात आली आहे.