वर्धा - महिलांवर होणाऱया अत्याचाराच्या घटनंमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याला आळा बसावा म्हणून महिलांच्या सन्मानार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सामूहिक उपवास आणि आत्मचिंतन केले जात आहे. हा कार्यक्रम पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री सुनिल केदार यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे.
हेही वाचा -
शाळकरी मुलींवर अत्याचार प्रकरणी 'त्या' दोषी शिक्षकावर बडतर्फीची कारवाई
महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना सातत्यानेल घडत आहेत. त्यामुळे अशा घटनांना आळा बसावा, महिलांचा सन्मान वाढवा, महापुरुषांनी दिलेला विचार समाजात पोहचवा, यासाठी त्यांच्याच विचारांचा अवलंब करत आत्मचिंतन करण्याच्या हा प्रयत्न आहे. या माध्यमातून समाजात जागृती निर्माण होण्यासाठी महिलांच्या सन्मानार्थ सामूहिक उपवास, आत्मचिंतन केले जात आहे. सकाळी 8 वाजता हा उपवास सुरू झाला असून रात्री 8 वाजेपर्यंत हा उपवास असणार आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात श्रद्धांजलीही वाहिली जात आहे.