वर्धा - कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी बनवले आहेत. यातील कुठला भाग शेतकऱ्यांच्या विरोधात आहे तो दाखवा. बाजारात मिळणाऱ्या भावापेक्षा जास्त दरात माल विकता येऊ शकत नाही का? शेतकऱ्यांना भाव ठरवण्याचा अधिकार नाही का? हा कायदा विरोधात नाही, असे अनेकदा बोललो. एमएसपीवर आतापर्यंत इतिहासात सर्वात जास्त म्हणजे, साडे तीन लाख कोटी रुपये दिले असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. गडकरी हे वर्ध्याच्या दौऱ्यावर होते.
हेही वाचा - 'सगळेच उपमुख्यमंत्रीपद मागत असतील, तर अपक्षालाही ते द्यावे'
देशात गहू तांदूळ मुबलक, तर तेल आयात करावे लागते
आंतरराष्ट्रीय किंमत आणि बाजार किमतीपेक्षा एमएसपी जास्त असते. काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. शेतकऱ्यांनी संवाद साधावा. शेतकऱ्यांनी क्रॉप पॅटर्न बदलने गरजेचे आहे. एकीकडे जगाला पुरेल इतका तांदूळ आपल्या देशात आहे. साखर, गहू हे मुबलक प्रमाणात आहेत. 90 हजार कोटीचे तेल आपण आयात करत आहोत. यासाठी तेलबिया किंवा तेल उत्पादन वाढले पाहिजे. यासाठी शेतीचा पॅटर्न बदलणे गरजेचे आहे. शेती क्षेत्रात समस्या आहेत. याबाबत सरकार सकारात्मक आहे. सरकारचे प्रयत्न आहे. हळूहळू समस्या सोडवल्या जातील. पण, काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. आमचे सरकार शेतकऱ्यांकरिता कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी संवाद करावा, आम्ही शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी कटिबद्ध आहोत, असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले.
दरवाढीवर बायोफ्युलचा पर्याय देणार
पेट्रोल डिझेल दरवाढी संदर्भात बोलताना विरोधी पक्षात होतो. आता सत्तारूढ पक्षात आहे. आता पेट्रोल डिझेलवर बायोडिझेल हा स्वस्त पर्याय शोधला आहे. 95 रुपये लिटर ऐवजी 60 रुपयात इथेनॉल देऊ. त्याच्या पंपासाठी परवानगी मिळाली आहे. पंप येत्या दोन-तीन महिन्यात सुरू होईल, अशी माहिती नितिन गडकरी यांनी दिली.
पूर्व विदर्भ डिझेलमुक्त करणार
शेतीला पुरक म्हणून त्या माध्यमातून बायोडिझेल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पुढील पाच वर्षात वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे डिझेलमुक्त करायचे आहे. बायो सीएनजीवर चालणाऱ्या वाहन कंपन्यांशी बोलने सुरू आहे. 12 फेब्रुवारीला बायोडिझेलवर चालनारा ट्रॅक्टर लाँच करणार आहोत. यामुळे वर्षाकाठी शेतकऱ्यांची 1 लाखाची बचत होणार आहे.
हेही वाचा - मत्स्यबीज घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात, महामार्गावर मासोळ्याचा सडा