वर्धा - शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्यावतीने निवेदनाची होळी करत मुंडन करून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन गांधी जिल्हा सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आले. यावेळी विविध मागण्या करत असल्याने दुर्लक्ष होत असल्याने मागील तीन वर्षांपासून देण्यात आलेल्या निवेदनाची होळी करत दुर्लक्षित धोरणाचा निषेध करण्यात आला आहे.
बेरोजगार संस्थेच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून बेरोजगार संस्थेच्या युवकांनकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे अनेक वर्षांपासून निवेदन देऊन संस्थेला प्राध्यान देऊन काम देण्याची मागणी होत आहे. प्रत्येक संस्थेला किमान 10 लाखाचे काम मिळावे जेणेकरून 11 सदस्य असलेल्या संस्थेला लाभ मिळेल. शासनाच्या सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत किंवा शासकीय जागेवर शहर किंवा ग्रामीण भाग व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावे, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी मुंडन आंदोलन करत निषेध नोंदवला. यासह या आंदोलनात अध्यक्ष वसंत धोबे, उपाध्यक्ष चेतन चोर, विशाल हजारे, आशिष सोनटक्के, अजय हिवंज, घनश्याम ठाकरे, यासह इतर पदाधिकारी उपास्थित होते.
हेही वाचा - राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात ४० टक्के कपात.. मंगळवारपासून नवे दर होणार लागू, राज्य सरकारचे आदेश