वर्धा- जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने सिंदी रेल्वे महसुल मंडळात फटका बसला. 8 गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले. या गावातील पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीची राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी पाहणी केली. त्यांनी हिंगणघाट मतदारसंघातील चानकी, कोपरा व पिंपळगाव येथील नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली.
वर्ध्यात अवकाळी पावसाने घरांची पडझड, पालकमंत्र्यांनी केली पाहणी - सेलू तालुक्यात अवकाळी पाऊस
सेलू तालुक्यात 14 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सिंदी रेल्वे महसूल मंडळातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले. पालकमंत्री सुनिल केदार यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
वर्ध्यात अवकाळी पावसाने घरांची पडझड, पालकमंत्र्यांनी केली पाहणी