ETV Bharat / state

वर्ध्यात मेणबत्ती लावून पार पडले मतदान; वादळी वाऱ्याचा फटका - due to power cut voting continue in candle light

अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नगर पालिके समोरील विद्युत वितरण कार्यालयावरील झाडांच्या फांद्या विद्युत वितरण करणाऱ्या तारांवर पडल्याने शहरातील अनेक मतदान केंद्र यामुळे प्रभावित झाली. यामुळे काही मतदान केंद्रांवर मेणबत्ती लावून मतदान घेण्यात आले.

वर्ध्यात अंधारात मेणबत्ती लावून पार पडले 20 मिनिट मतदान
author img

By

Published : Oct 21, 2019, 8:55 PM IST

वर्धा - हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात अचानक आलेल्या पावसामुळे वीज गेल्याने मेणबत्ती लावून मतदान पार पडले. यामुळे या ठिकाणी मतदानाचा टक्का थोड्या प्रमाणात प्रभावित होण्याची संभावना आहे.

वर्ध्यात अंधारात मेणबत्ती लावून पार पडले 20 मिनिट मतदान

अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नगर पालिके समोरील विद्युत वितरण कार्यालयावरील झाडांच्या फांद्या विद्युतवाहक तारांवर पडल्याने शहरातील अनेक मतदान केंद्र यामुळे प्रभावित झाली. यामुळे काही मतदान केंद्रांवर मेणबत्ती लावून मतदान घेण्यात आले. याचा मतदारांना त्रास सहन करावा लागला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका असल्याने प्रशासन सतर्क असतो. मात्र, हिंगणघाट विधानसभा मतदासंघातील हिंगणघाट शहरात विद्युत विभागाचा हलगर्जीपणा दिसून आला आहे.

हेही वाचा - एक्झिट पोल : सेना-भाजपला स्पष्ट बहुमत.. महायुतीला १९० ते २३० जागांचा अंदाज, भाजप ठरणार सर्वात मोठा पक्ष

विद्युत विभागाचे सहायक अभियंता हेमराज पाटील हे आपल्या कर्तव्यावर उपस्थित नसल्याने विज वितरण विभागाकडून विज सुरू करण्यास जवळपास वीस मिनिटे लागली. याबाबत सहायक अभियंता हेमराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत भेटण्यासाठी टाळाटाळ केली. निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मतदानावर प्रभाव पडला आहे. सहायक अभियंत्याच्या हलगर्जीपणामुळे आणि मुख्यालयात मतदानाच्या दिवशी गैरहजर राहिल्याने मतदारांची मोठी गैरसोय झाली. यामध्ये अनेक मतदान केंद्रावर अंधारात मेणबत्ती लाऊन मतदान घेण्यात आले.

हेही वाचा - दोन्ही हात नसतानाही पुण्यातील 'या' महिलेने केले मतदान

Intro:mh_war_hing_andhar_matdan_vis1_byte1_mhc 10016

वर्धा
अंधारात मेणबत्ती लावून पार पडले 20 मिनिट मतदान
वर्धा: हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात अचानक आलेल्या पावसाने व विजेने खेळखंडोबाने मतदाराची अडचण वाढवली असल्याने मतदानाचा टक्का थोड्या प्रमाणात प्रभावित होण्याची संभावना आहे . चार वाजता आलेल्या मुसळधार पावसामुळे नगर पालिका पुढील विद्युत वितरण कार्यालयाच्या वरील झाडांच्या फांद्या विद्युत वितरण करणाऱ्या तारांवर पडल्याने शहरातील अनेक मतदान केंद्रांवर अंधार पसरलेला होता. काही मतदान केंद्रांवर मेणबत्ती लावून मतदान घेण्यात आले . यात अनेक लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका असल्याने प्रशासन विभाग चुस्त व सतर्क असतो. मात्र हिंगणघाट विधानसभा मतदासंघातील हिंगणघाट शहरात विद्युत विभागाची हलगर्जीपणा दिसून आली . विद्युत विभागाचे सहायक अभियंता हेमराज पाटील हे आपल्या कर्तव्यावर उपस्थित नसल्याने वीज वितरण विभागाकडून वीज सुरू करण्यास वीस मिनिट दिरंगाई झाले. या बाबत सहायक अभियंता हेमराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते उडवा उडवी चे उत्तरे देत भेटण्यासाठी टाळत होते. यात ते कधी साईड वर आहो तर कधी खोलीवर आ हो अशे उत्तरे देत असल्याने निवडणुकीच्या मतदान दिनी विद्युत वितर नच्या अधिकाऱ्यांची हलगर्जी पणा मतदानावर प्रभाव टाकणारी पडली .या सहायक अभियंत्याच्या हलगर्जी पनामुळे व मुख्यालयात मतदा नाच्या दिवशी गैरहजर राहिल्याने मतदा राची मोठी गैरसोय झाली. यात अंधारात अनेक मतदान केंद्रावर मेणबत्ती लाऊन मतदान घेण्यात आले.Body:चेतन_वाघमारे_हिंगणघाट_विधानसभा_वर्धाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.