ETV Bharat / state

Satellite Pieces Found At Wardha : चंद्रपूरनंतर आता वर्ध्याच्या वाघेडा ढोक शिवरातही सापडले उपग्रहाचे अवशेष

आकाशातून सेटेलाईट सदृश्य जळती वस्तू ( Burnt Satellite Pieces fell At Wardha ) अनेकांना दिसल्यानंतर चर्चा सुरू झाली. यातील काही भाग हा चंद्रपूर जिल्ह्यातील लाडबोरी येथे तबकडी मिळून ( Burnt Satellite At Ladbori ) आली. तेच वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा ढोक शिवरातील शेतात सिलेंडरसारखा ( Cylinder Shape Satellite At Wagheda Dhok Farm ) अवशेष मिळून आला.

Burnt Satellite Pieces fell At Wardha
Burnt Satellite Pieces fell At Wardha
author img

By

Published : Apr 3, 2022, 5:06 PM IST

Updated : Apr 3, 2022, 6:56 PM IST

वर्धा - आकाशातून सेटेलाईट सदृश्य जळती वस्तू ( Burnt Satellite Pieces fell At Wardha ) अनेकांना दिसल्यानंतर चर्चा सुरू झाली. यातील काही भाग हा चंद्रपूर जिल्ह्यातील लाडबोरी येथे तबकडी मिळून ( Burnt Satellite At Ladbori ) आली. तेच वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा ढोक शिवरातील शेतात सिलेंडरसारखा ( Cylinder Shape Satellite At Wagheda Dhok Farm ) अवशेष मिळून आला. शनिवारी रात्री हे पडले असून आज सकाळी ही बाब समोर आली. ही माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी साहित्य जप्त करत कारवाईला सुरवात केली आहे.

प्रतिक्रिया

सिलिंडरच्या आकाराची आहे वस्तू - समुद्रपुरा तालुक्यातील वाघेडा ढोक शिवरातील नितीन सोरटे यांच्या शेतात सकाळी त्यांना एक सिलिंडरच्या आकाराची वस्तू शेतकऱ्याच्या नजरेस पडली. शेतकऱ्याने तातडीने ही माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत साहित्य जप्त केले आहे. सिलिंडरच्या आकाराचे हे साहित्य असून त्याचे वजन जवळपास तीन ते चार किलो असल्याची सांगितले जात आहे. त्याची लांबी दोन ते अडीच फूट दरम्यान आहे. हे अवशेष एका सिलेंडर प्रमाणे दिसत असले तरी साहित्य आतून पोकळ असून प्लास्टिकसारख्या वस्तूचे असल्याचे बोलले जात आहे. यावर काळ्या धाग्यासारख्या वास्तूचे आवरण असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चंद्रपुरातही दिसले अवशेष - काल रात्री सिंदवाही तालुक्यातील लाडबोरी या गावाच्या परिसरात लोकांनी जोराचा आवाज ऐकला. पुढे हा आवाज एखाद्या विमानासारखा झाला. मात्र, त्यानंतर एखादा मोठा स्फोट झाल्याचे गावकऱ्यांनी ऐकले. वास्तविक उपग्रहाचे तुकडे या ठिकाणी जळून पडले होते. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये एक जळालेली रिंग आणि एक गोल वस्तूचा समावेश आहे. एक मोठी रिंग एका बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर पडली. तीचा आकार साधारण दहा बाय असून, जाडी आठ ते दहा इंच असून वजन 40 किलो आहे.

काय आहे प्रकरण - शनिवारी रात्री नागपूर, अमरावतीसह विदर्भातील अनेक ठिकाणी आकाशात प्रकाशाचा प्रखर झोत येताना दिसला. प्रथमदर्शनी या उल्का असल्याचे सांगितले जात होते. मात्र, याबाबत अजूनही कोणत्याही प्रकारे प्रशासकीय पातळीवरुन काहीही सांगण्यात आलेले नाही. नागपूररचे खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. आकाशातील एखादे सॅटेलाईट पडले असण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे - न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर-पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच असावेत. आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्‍या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चीत. ही माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

हेही वाचा - Satellite Parts Felling Issue : उपग्रहाच्या तुकड्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक - तहसीलदार

Last Updated : Apr 3, 2022, 6:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.