वर्धा - जिल्हयातील अनेक भाविक हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्याव्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. या भाविकांना जिल्ह्यात आल्यावर कोविड तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. हरिद्वारात कुंभमेळादरम्यान २ दिवसात १०२ पेक्षा अधिक साधूंना कोरोनाची लागण झाली होती. वर्धा जिल्ह्यातही कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
अत्यावश्यक सेवेच्या वेळेत बदल
वर्ध्यात कोरोना बाधितांची संख्या साडे तीन हजार झाली आहे. यामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता कठोर निर्बध लावण्याचा निर्णय प्राशसनाने घेतला आहे. यात वर्धा जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांच्या नावात दिवसभर फिरणाऱ्यांवर अंकुश लावण्यात आले आहे. शनिवारपासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजतापर्यंतच अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहे. यात दूध भाजीपाला, किराणा दुकान आदींचा समावेश आहे. यामध्ये वैद्यकीय सेवा, मेडिकल सेवा या नियमित वेळेनुसार सुरू असून त्यांच्या वेळेत कुठलाच बदल करण्यात आलेला नाही आहे.तसेच खानावळ, हॉटेल, रेस्टॉरंट येथून पार्सल सेवा दूध केंद्र, दूध घरपोच वितरण सेवा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहेत. तर किराणा, भाजीपाला, फळ विक्री आदी सेवा सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंतच मिळणार आहेत. वैदकीय सेवा मेडिकलही नियमित सुरू राहतील.