वर्धा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असता आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहे. ऑक्सिजन असो की बेड याचा तुटवडा पाहायला मिळाला. या परिस्थितीत खासदार रामदास तडस यांनी इसापूर शिवारातील विभागीय ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रात 100 खाटांचे कोविड रुगणालाय सुरू करण्यात आले. यामुळे देवळी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनाही आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.
केले जाणार संस्थात्मक विलगीकरण -
ग्रामीण आणि शहरी भागात कोरोना रुग्णांना गृहविलगीकरणाची व्यवस्था नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या परिस्थितीत सौम्य लक्षण असलेल्या कोरोना रुग्णांना, या कोविड केअर सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. जेणेकरून कोरोना रुग्णांमुळे त्यांच्या घरच्यांना परिसरातील लोकांना कोरोनाची लागण होऊ नये.
मोफत विविध सुविधा -
या कोविड सेंटरमध्ये १०० खाटांच्या व्यवस्थेसह सकाळी चहा नास्ता, दुपारी व सायंकाळी जेवण, २४ तास पिण्याकरिता गरम पाणी, निसर्गरम्य असा परिसर, प्राथमिकता लक्षात घेऊन रुग्णांकरता वैद्यकीय सेवा तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, सुरक्षारक्षक, असणार आहे. यात एकटेपणा वाटू नये म्हणून रुगणाच्या नातेवाईकांना लांबून भेटण्याची सुविधा सुद्धा उभारण्यात आली आहे. यासाठी कुठलेही पैसे द्यावे लागणार नसून हे संपूर्ण मोफत असणार असल्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितले आहे.
गंभीर परिस्थितीत रुग्णवाहिकेची सोय -
याठिकाणी डॉक्टर आणि परिचारिका असणार आहेत. यात 10 बेड ऑक्सिजनचे देऊन हे सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मागवण्यात आली आहे. अचानक गंभीर परिस्थिती उद्भवल्यास त्वरित रुग्णाला हलविण्यासाठी 24 तास रुग्णवाहीका उपलब्ध असणार आहे. त्यासाठी 9730929263 हा मदत दूरध्वनीक्रमांक जाहीर करण्यात आला आहे.