ETV Bharat / state

काँग्रेसने सामान्य माणसांची नाही, तर चेल्या-चपाट्यांची गरीबी दूर केली - मुख्यमंत्री - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्ध्यातील आर्वी येथील गांधी चौकात महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर घणाघात केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Apr 5, 2019, 10:38 AM IST

वर्धा - तुमच्या पणजोबांनी सांगितले, आजींनी सांगितले, बाबाने सांगितले, आईने सांगितले अन् आता राहुल गांधीही सांगतात गरिबी हटवू. पण गरीबी हटली नाही, तर वाढली. काँग्रसने सामान्य माणसांची नाही, तर चेल्याचपाट्यांची गरीबी दूर केल्याचा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर वर्ध्यातील केला. वर्षाला 72 हजार रुपये राहुल गांधी गरीबांना देऊ म्हणतात, मात्र पैसे आणणार कुठून असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वर्ध्यातील आर्वी येथील गांधी चौकात महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की 72 हजार रुपये देऊ हे मुंगेरीलालच्या स्वप्नासारखे आहे. कोंबडी आणि अंड्याचा धंदा राहुल गांधी बंद करावा असेही ते म्हणाले.
राहुल गांधी आणि पक्षात खोटे बोलणारे लोकं आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी खुमासदार किस्सा सांगत धमाल उडवली. यांनी देशाचे भले केले नाही, तर फक्त स्वतःचे भले केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
यापूर्वी मुंबईतील बॉम्बस्फोट हल्ला झाला तेव्हा तीव्र निषेध केला. युनोत जाऊन एखाद्या लाहान पोराने सांगावे, तसे पाकिस्तानला रागवा असे म्हणत 120 कोटीच्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान झालेल्या हल्ल्याचा बदला घेऊ शकत नव्हते. पण पंतप्रधान मोदींनी हे करून दाखवले. तसेच बालाकोटच्या हल्ल्यावर बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

यावेळी पाकिस्तानवर हल्ला झाला की नाही, यावर दोनच लोकांवर संशय आहे. इतर देश मान्य करतात. पण पाकिस्तान मान्य करत नाही आणि दुसरे म्हणजे काँग्रेस मान्य करत नाही. पहिले माहीत असते तर तुमचा एखादा नेता रॉकेटसोबत बांधून पाठवला असता असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मंचावर लोकसभा उमेदवार रामदास तडस, माजी आमदार दादाराव केचे, सुधीर दिवे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, विजय वाजपेयी, शिवसेनेचे अनंत गुढे, बाळू शाहागडकर, महेश चौधरी, रिपाईचे विजय आगलावे आदी मंचावर उपस्थित होते.

Intro:वर्धा- R_MH_4_MARCH_WARDHA_CM_SABHA_VIS_1
यात 1 ते 6 फाईल या FTP ने पाठवल्या आहे. 1 व्हिजवल फाईल सुद्धा कॅमेरा शॉट्स आहे. पोपट या विशेष प्रोग्रॅमसाठी यातील काही बाईट वापरता येऊ शकेल.

काँग्रेसच्या गरिबी हटावच्या जाहिरनाम्यावर गांधी घराण्यावर टीका- मुख्यमंत्री फडणवीस

राहुल गांधी म्हणता गरिबी हटवू, तुमच्या पनजोबानी ससंगीतले गरिबी हटवू, आजींनी सांगितले, बाबाने सांगितले, आई ने सांगितले गरिबी हटवू, हटली नाही तर गरिबी वाढली. वर्षाला 72 हजार देऊ म्हणतात. कुठून आणला पैसा तर आणू असे ऊत्तर देत असल्याचे सांगत गांधी घराण्यावर गरिबी वरून चांगलीच टीका केली.

वर्ध्यातील आर्वी येथे गांधी चौकात आयोजित जाहिर सभेत बोलत होते. महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेसाठी ते आर्वीत आले होते.

72 हजार देऊ हे मुंगेरीलालचे स्वप्नासारखे आहे. कोंबडी आणि अंड्याचा धंदा राहुल गांधी बंद करा. सामन्य माणसाची गरिबी दूर केली नाही तर चेल्या चपाट्यांची गरिबी दूर केली. असेही म्हणाले.

राहुल गांधी आणि पक्ष खोटे बोलणारे लोक आहे. यावर गंमतीचा किस्सा सांगितला. यात नदी बांधू आणि नंतर पूल बांधू, असे सांगताच हशा पिकला.यांनी देशाचं भलं केलं नाही तर फक्त स्वतःच भल केल्याचा आरोप केला.

यापूर्वी मुंबईतील बॉम्ब स्फोट हल्ला झाला तेव्हा निषेध, केला तीव्र निषेध केला, युनोत जाऊन एखाद्या लाहान पोराने सांगावे तसे पाकिस्तानला रागवा अस म्हणत 120 कोटच्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान झालेल्या हल्ल्याचा बदला घेऊ शकत नव्हते. पण पंतप्रधान मोदींनी हे करून दाखवले. तसेच बाला कोटच्या हल्यावर बोलतांना काँग्रेसवर हल्ला चढवला.

यावेळी पाकिस्तानवर हल्ला झाला की नाही यावर दोनच लोकांवर संशय आहे. इतर देश मान्य करतात, पण पाकिस्तान मान्य करत नाही, आणि दुसरे म्हणजे काँग्रेस मान्य करत नाही. पाहिले माहीत असते तर तुमचा एखादा नेता रॉकेट सोबत बांधून पाठवला असता असेही म्हणाले.

यावेळी मंचावर लोकसभा उमेदवार रामदास तडस, माजी आमदार दादाराव केचे, लोकसभा प्रमुख सुधीर दिवे, जीप उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, विजय वाजपेयी,शिवसेनेचे अनंत गुढे, बाळू शाहागडकर, महेश चौधरी, रिपाईचे विजय आगलावे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

Body:पराग ढोबळे, वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.