ETV Bharat / state

कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडर वाढवण्यासाठी सीसीआयकडून हिरवा कंदील

पालकमंत्री सुनिल केदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, जिनर्स आणि ग्रेडर यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यात कापूस खरेदी प्रक्रिया गतीने करण्यासाठी कापूस खरेदी केंद्र वाढवणे आणि ग्रेडर उपलब्ध करून देण्यासाठी सीसीआयचे (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) महाव्यवस्थापक अजय कुमार यांनी तयारी दर्शवली आहे.

Cotton
कापूस
author img

By

Published : May 20, 2020, 9:18 AM IST

वर्धा - जिल्ह्यात कापूस खरेदी प्रक्रिया गतीने करण्यासाठी कापूस खरेदी केंद्र वाढवणे आणि ग्रेडर उपलब्ध करून देण्यासाठी सीसीआयचे (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) महाव्यवस्थापक अजय कुमार यांनी तयारी दर्शवली आहे. हिंगणघाट आणि समुद्रपूरमध्ये नवीन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या निविदा प्रक्रियेसाठी सीसीआयने होकार दिला. यामुळे पुढील काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

वर्ध्यातील कापूस खरेदी केंद्रावर जाणारी वाहने

पालकमंत्री सुनिल केदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, जिनर्स आणि ग्रेडर यांच्याशी चर्चा केली. कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास काही जिनर्सने यावेळी तयारी दर्शवली. त्यामुळे कापूस खरेदीचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्ह्यात अंदाजे 30 लाख क्विंटल कापसाचे उत्पादन झाले आहे. त्यापैकी 26 लाख क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. उर्वरित कापूस मान्सून सुरू होण्यापूर्वी खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कापूस हा हिंगणघाट तालुक्यात आहे. यासाठी जिल्ह्याचे खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार यांनी सीसीआयला जास्तीत जास्त कापूस खरेदी करण्यासाठी मागणी केली होती.

जिल्ह्यात रोहणा -1, आर्वी - 1, खरांगणा -1, कारंजा -1, सेलू- 1, समुद्रपूर- 1, हिंगणघाट-2, वर्धा- 2 अशा दहा ठिकाणी ग्रेडर देण्यासाठी मागणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यात सर्वच तालुक्यात सुरू असलेल्या खरेदी केंद्राशिवाय आणखी 10 नवीन केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यासाठी सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी तयारी दर्शवली. यामध्ये खासगी जिनर्सनीसुद्धा सहभाग घ्यावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

तसेच मजुरांचा प्रश्न कृषी उत्पन्न बाजार समिती आणि संबंधित जिनर्सने सोडवावा. सध्या कापूस खरेदी झालेल्या ठिकाणी जमा असलेली सरकी उचलण्यासाठी सीसीआयने प्रक्रिया राबवावी. तसेच जास्त ग्रेडर ठेवण्यासाठी कृषी विभागाने त्यांचे ग्रेडर तयार करावेत, अशा सूचना पालकमंत्री केदार यांनी दिल्या. ज्या जिनिंग सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही केदार यांनी सांगितले.

या बैठकीला आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, सीसीआयचे महाव्यवस्थापक अजय कुमार, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, जिनर्स व ग्रेडर्स उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.