ETV Bharat / state

भरधाव वाहनाच्या धडकेत एका शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू, दोघी गंभीर जखमी

शेतातली कामे आटोपून सायंकाळी ३ शेतमजूर महिला घरी जात होत्या. यावेळी नागपूरकडून अमरावतीला भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याकडेला चालणाऱ्या महिलांना चारचाकीने धडक दिली. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

author img

By

Published : Dec 6, 2019, 11:34 PM IST

wardha
कारच्या धडकेत शेतमजूर महिलेचा मृत्यू, दोघी गंभीर जखमी

वर्धा : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग ६ वरील कारंजा तालुक्यातील ठाणेगावजवळ एका चारचाकीने पायी जाणाऱ्या महिलांना जबर धडक दिली. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. शेतावरील काम संपवून घरी जात असताना या महिलांसोबत ही दुर्दैवी घटना घडली. भाग्यरथी चंपक धुर्वे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातानंतर चालक आणि त्यात बसलेल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे सांगितले जात आहे.

कारच्या धडकेत शेतमजूर महिलेचा मृत्यू, दोघी गंभीर जखमी

शेतातली कामे आटोपून सायंकाळी ३ शेतमजूर महिला घरी जात होत्या. यावेळी नागपूरकडून अमरावतीला भरधाव जाणाऱ्या चारचाकीचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याकडेला चालणाऱ्या महिलांना चारचाकीने धडक दिली. यामध्ये कार (एमएच २७, व्हीबी ८८५५) ची जोरदार धडक बसल्याने भाग्यरथी धुर्वे या शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, सोबतच्या सरस्वती गणपत दूधकवळे आणि शालिनी सुनील येडमे (दोघीही राहणार ठाणेगाव) या दोघी गंभीररित्या जखमी झाल्या आहेत.

हेही वाचा - वर्ध्यात एसबीआयचे एटीएम चौथ्यांदा फोडण्याचा प्रयत्न; सीसीटीव्ही बंद, एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर

कारचा अपघात होताच चालक आणि त्यातील काही लोक हे वाहन सोडून घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगितले जात आहे. अपघातात जखमी झालेल्या महिलांना कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार करण्यात आला. कारंजा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे. यात अपघाताच्यावेळी वाहन नेमके कोण चालवत होते, याचा शोध घेणे सुरू आहे.

हेही वाचा - 'भर रस्त्यात शिक्षा दिल्याशिवाय कायद्याची भीती निर्माण होणार नाही'

Intro:mh_war_accident_on_nh6@7204321

कारच्या धडकेत शेतमजूर महिलेचा मृत्यू, दोघी गंभीर जखमी,
- राष्ट्रीय महारगमार्ग सहा वरील नागपूर अमरावती दरम्यानची घटना
- कारंजा तालुक्यातील ठाणेगाव लगत झाला अपघात
- भरधाव वाहनाच्या धडकेत एका शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू दोघी जखमी

वर्धा- नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग सहावरील कारंजा तालुक्यातील ठाणेगाव नजीक एका कारने पायदळ जाणाऱ्या महिलांना जबर धडक दिली. यात एकीचा जागीच मृत्यू झाला तर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेय. शेतावरील काम संपवून घरी जाताना महिला शेतमजुतिचे काम करणाऱ्या महिलांसोबत ही दुर्दैवी घटना घडली. भाग्यरथी चंपक धुर्वे असे मृतक महिलेचे नाव आहे.

सायंकाळी शेतातली काम आटोपून घरी जात असताना नागपूरकडून अमरावतीच्या दिशेने जाणारी भरधाव कार ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले. यावेळी रस्त्याच्याकडेने जात असणाऱ्या तीन शेतमजूर महिलांना धडक दिली. यात कार क्रमांक MH27, VB 8855ची जोरदार धडक बसताच गंभीर जखमी झाल्याने भाग्यरथी चंपत धुर्वे नामक शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू झाला.

तेच सोबतच्या सरस्वती गणपत दुधकवळे आणि शालिनी सुनील येडमे दोघीही ठाणेगावच्या रहवासी असून जखमी झाल्यात. कारचा अपघात होताच वाहन सोडून चालक आणि त्यातील काही लोक हे घटनास्थळून निघून गेल्याचे सांगितले जात आहे. अपघातात जखमी झालेल्या महिलांना कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. दोन्ही महिलांवर रुग्णालयात प्रथोमपचार करण्यात आला. कारंजा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केलाय. यात अपघातवेळी वाहन नेमके कोण चालवत होते याचा शोध घेणे गरजेचे आहे. तपासात अद्याप नाव पुढे न आल्याने चालकाचे नाव कळू शकले नाही.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.