ETV Bharat / state

'भर रस्त्यात शिक्षा दिल्याशिवाय कायद्याची भीती निर्माण होणार नाही' - Wardha latest news

कायद्यात बदल करण्याची मागणी यावेळी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांनी केली. या घटना पाहता आरोपींच्या मनात भीती निर्माण व्हावी, अशी शिक्षा जोपर्यंत दिली जाणार नाही, तोपर्यंत हे कृत्य करणाऱ्यांमध्ये भीती जरब बसणार नाही, असेही टोकस यांनी सांगितले.

Charulata tokas
चारुलता टोकस
author img

By

Published : Dec 5, 2019, 10:40 PM IST

वर्धा - सामाजिक संघटनांनी आज एकत्र येत हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा तीव्र निषेध केला. शहरातील दोन वेग-वेगळ्या ठिकाणाहून कँडल मार्चला सुरुवात झाली. तर शिवाजी चौकात एकत्र येत डॉक्टर तरुणीला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

चारुलता टोकस, महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षा

आरोपींना भर रस्त्यावर शिक्षा देणे गरजेचे आहे. शिवाय कायद्यात बदल करण्याची मागणी यावेळी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांनी केली. या घटना पाहता आरोपींच्या मनात भीती निर्माण व्हावी, अशी शिक्षा जोपर्यंत दिली जाणार नाही, तोपर्यंत हे कृत्य करणाऱ्यांमध्ये भीती जरब बसणार नाही, असेही टोकस यांनी सांगितले.

हेही वाचा - विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात वर्धा नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन

नेहमी मुलींना संस्कार दिले जावेत, असे बोलले जाते. मात्र, मुलेच लहान वयात चुकीच्या मार्गाने भटकू लागली आहेत. त्यांच्यावर योग्य संस्कार करणे गरजेचे आहे, असे मत एका मुलीची आई या नात्याने मनीषा मेघे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - वैद्यकीय अधिकार्‍याअभावी रुग्णवाहिकेला ब्रेक; कंत्राटी कंपनीचे दुर्लक्ष

या कँडल मार्चमध्ये नर्सिंग ट्रेनिंग स्कूल, नर्सिंग स्टाफ व विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघ, पणती महिला संघ, नर्सिंग स्कूल असोसिएशन, वर्धा सोशल फोरम, फूटपाथ स्कूल, सह्याद्री फौंडेशन, सैनिक संघटना तसेच यासाठी डॉ. शिल्पा सातव, मनीषा मेघे, डॉ.अभ्युदय मेघे, मोहित सहारे, अनिकेत भोयर, चेतन काळे, विशाल उराडे, इंदू अलवडकर, अख्तर शेख, अमोल बालपांडे, दक्षता ढोके, हेमा शिंदे, शाम परसोडकर आदींनी प्रयत्न करत मार्च काढला.

Intro:mh_war_candel_march_vis_7204321
बाइट अनुक्रम

बाईट- चारूलता टोकस, अध्यक्ष महिला प्रदेश काँग्रेस,
बाईट- मनीषा मेघे, एव्हीबीएचआर, सावंगी.(आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय.)

भर रस्त्यात शिक्षा दिल्याशिवाय कायद्याची भीती निर्माण होणार नाही- अध्यक्ष महिला प्रदेश काँग्रेस चारुलता टोकस

वर्ध्यात आज सामाजिक संघटनांनी एकत्र येत हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर झालेलता घटनेचा तीव्र निषेध केला. कँडलमार्च काढत श्रद्धांजली वाहिली. शहरातील दोन वेग वेगळ्या ठिकाणाहून कँडलमार्चला सुरवात करण्यात आली. शिवाजी चौकात एकत्र येत श्रद्धांजली पुन्हा निर्भयेला श्रध्दांजली वाहण्यात आली. मात्र यावेळी महिला वैदकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिला भगिनीनि सहभाग घेतला. घटनेचा तीव्र निषेध करत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

यावेळी मात्र घटनेचे तीव्रता पाहता तसेच मागील काळातील घटना पाहता आरोपीना भर रस्त्यावर भीती निर्माण व्हावी असे कृत्य पुन्हा करू नये अशी शिक्षा देने गरजेची आहे. शिवाय कायद्यात ही बदल करण्याची मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस यांनी केली. पुरोगामी महाराष्ट्रात म्हणता अश्या प्रकरच्या लाजिरवण्या घटना होत असता कुठेतरी प्रशासन कठोर पाऊल उचलत नसल्याचे त्या म्हणाल्यात. या घटना पाहता भीती निर्माण व्हावी अशी शिक्षा जोपर्यंत दिली जाणार नाही तो पर्यंत हे कृत्य करणाऱ्यांमध्ये भीती जरब बसणार नाही. यासाठी जलदगतीने प्रकरण चालवत निकाल द्यावी अशी मागणी केली.

यावेळी नेहमी मुलींना संस्कार दिले जावे बोलावले जातात. पण आजची पररिस्थिती बदलली आहे. हातातली इलेक्ट्रॉनिक माध्यमातून लहान वयात चुकीच्या मार्गाने मुले भटकू लागली असल्याने त्यांच्यावर योग्य संस्कार देण्याकडेही लक्ष दिले पाहिजे अशी भावना एका मुलीची आई म्हणून सांगताना मनीषा मेघे यांनी व्यक्त केली.

या कँडलमार्च मध्ये नर्सिंग ट्रेनिंग स्कुल, नर्सिंग स्टाफ व विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघ, पणती महिला संघ, नर्सिंग स्कूल असोसिएशन, वर्धा सोशल फोरम, फूटपाथ स्कूल, सह्याद्री फौंडेशन, सैनिक संघटना तसेच यासाठी डॉ. शिल्पा सातव, मनीषा मेघे, डॉ.अभ्युदय मेघे, मोहित सहारे,अनिकेत भोयर, चेतन काळे, विशाल उराडे, इंदू अलवडकर, अख्तर शेख, प्रा.अमोल बालपांडे, प्रा.दक्षता ढोके, प्रा.हेमा शिंदे, शाम परसोडकर आदींनी प्रयत्न करत कँडल मार्च काढला. Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.