ETV Bharat / state

Bus Accident in Wardha: वर्ध्यात बसचा विचित्र अपघात; तीन बस एकमेकांना धडकून 15 जण जखमी - तीन बस एकमेकांना धडकून विचित्र अपघात

वर्ध्यात तीन बस एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 15 जण जखमी झाल्याची घटना घडली. हा महाबळजवळ अपघात झाला आहे.

Bus Accident in Wardha
वर्धा बस अपघात
author img

By

Published : May 10, 2023, 2:23 PM IST

वर्धा बस अपघात

वर्धा : नागपूर येथून वर्ध्याकडे जाणाऱ्या तीन बस एकमेकांना मागून धडकल्या. टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसच्या मागे प्रवाशी घेण्यासाठी थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या बसने जबर धडक दिली. यात धडक देणाऱ्या मागच्या बसचा चालक गंभीर जखमी झाला, तर वाहकासह पंधरा प्रवाशी जखमी झाले. हा अपघात नागपूर वर्धा महामार्गावर महाबळा नजीक जंगलापूर शिवारात झाला. अपघात झाला तेव्हा एकच खळबळ उडाली. प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.

बसला मागून जबर धडक : पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर येथून पुसदकडे जाणारी उमरेड आगाराची एसटी बस क्रमांक एमएच 40 वाय 5585 ही पंक्चर झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या कडेला थांबून चालक टायर बदलवीत होता. तिच्या मागेच नागपूरकडून दिग्रसला जात असलेली बस क्रमांक एमएच 06 एस 8090 ही बस प्रवाशी घेण्यासाठी रोडच्या मधोमध थांबली. त्या दरम्यान नागपूरकडून देगलूरला जाणारी एसटी बस क्रमांक एमएच 20 बीएल 4104 ही भरधाव आली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात प्रवासी घेत असलेल्या बसला मागून जबर धडक दिली.

घटनास्थळी पंचनामा : यात धडक देणाऱ्या बसचा चालक कांबळे हा गंभीर जखमी झाला, तर वाहक गजानन मुंडकर व 15 प्रवाशी किरकोळ जखमी झाले. जखमीपैकी 10 प्रवाशांना रुग्णवाहिकेतून सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले, अंचली तेलरांधे, साक्षी वरटकर, शंतनू कावलकर, गौरव उईके हे चार प्रवाशी केळझर येथून बसले होते. त्यांना किरकोळ मार असल्याने त्यांनी खासगी दवाखान्यात उपचार केला. या अपघाताची माहिती मिळताच सेलूचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय कापसे, बाळकृष्ण डवरे, सुरेश मडावी, विक्रम काळमेघ यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करीत वाहतूक सुरळीत केली.

प्रवाशांची तारांबळ उडाली : या घटनेने प्रवाशांची तारांबळ मात्र नक्कीच उडाली होती. सध्या जिल्ह्यामध्ये कडाक्याची ऊन पडत आहे. या वातावरणामध्ये अगोदरच नागरिक त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यातच हा अपघात झाल्याने सर्व प्रवाशांना एकच मानसिक धक्का बसला असल्याचे दिसून येत होते. या अपघातामध्ये एसटी बसचे जास्त नुकसान झाले नसले नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. अधिक तपास सेलू पोलीस करीत आहे.

  1. हेही वाचा : Travel Accident: पेठजवळ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; ट्रॅव्हल्स नदीत कोसळून एका प्रवाशाचा मृत्यु तर 20 ते 25 गंभीर जखमी
  2. हेही वाचा : Nitin Gadkari News: ...म्हणून २००४ मध्ये अपघातात संपुर्ण कुटुंब वाचले- नितीन गडकरी
  3. हेही वाचा : Major Road Accident In MP : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये प्रवासी बस पुलावरुन कोसळल्याने भीषण अपघात, 24 प्रवाशांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.