ETV Bharat / state

बल्ब, होल्डरवरही डल्ला; वर्ध्यात भुरट्या चोरांचा त्रास - वर्धा पोलीस

वर्ध्यातील विरुळ गावात हे घडले आहे. जवळपास 12 बल्ब चोरील गेले असून, चोरांनी चक्क ते विकून दारू पिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

bulb stolen by thief in wardha
वर्ध्यात चोरांनी चक्क बल्ब चोरले
author img

By

Published : Jan 24, 2020, 7:54 AM IST

Updated : Jan 24, 2020, 3:34 PM IST

वर्धा - चोरटे केव्हा काय चोरतील याचा नेम नाही. आजपर्यंत घरापुढे लावलेले बल्ब चोरीला जातील असे वाटले नसेल. पण वर्ध्यातील विरूळ गावात हे घडले. जवळपास 12 बल्ब चोरील गेले असून चोरांनी ते विकून दारू पिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी बल्बच्या वायर कापून होल्डरही चोरले आहेत. स्थानिक या त्रासाला कंटाळे असून बल्ब चोरीची तक्रार पोलिसात दाखल करणार असल्याचे ते म्हणत आहेत.

बल्ब, होल्डरवरही डल्ला; वर्ध्यात भुरट्या चोरांचा त्रास

हेही वाचा - 'खोटी आश्वासने देणाऱ्या लोकांच्या स्पर्धेत केजरीवालांना मिळेल पहिले बक्षीस'

चोराने एका कुटुंबाच्या घरी सगळ्याच बल्बची चोरी केल्यामुळे घरातील वृद्ध महिलेने प्रचंड संताप व्यक्त केला. ती म्हणाली, "मी हा बल्ब उधारीने आणला होता. अजून दुकानदाराचे पैसेसुद्धा दिलेले नाहीत, त्याआगोदरच चोरांनी बल्ब चोरून नेला."

Intro:वर्धा

mh_war_light_chori_pkg_7204321

अबब...घराबाहेरील सीएफएल लाईट चोरीला... होल्डरही गायब....तळीरामांवर संशय

- एकाच रात्री गावातील 10 ते 12 लाईट चोरीला
- तळीरामावर लाईट चोरून नेल्याचा संशय
-पुढल्या वेळी प्रकार झाल्यास पोलीस तक्रार देण्याचा मानस

वर्धा- चोरटे केव्हा काय चोरतील याचा नेम नाही... आजवर घरापुढं लावलेले लाईट, वायर, होल्डर चोरीला जाईल असे ऐकलेले नाही. पण वर्ध्यातील विरुळ गावात भुरट्या चोरट्यांनी चांगलाच उपद्रव केला आहे. घराच्या अंगणात उजेडासाठी लावलेल्या लाईटवरच चोरट्यांनी हात साफ केला. काही घरचे लाईट तर काही घरचे लाईटसोबतच वायर, होल्डरही चोरट्यांनी पळवले आहे. वाटते न अजब गजब पण तळीरामनी ताहान भागवण्यासाठी हा उपद्रव केला असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

चोरटे कशावर डल्ला मारतील, याचा नेम नाही. त्याचा . अनेक चोऱ्या पाहिल्यात त्यात तूर महाग झाली म्हणून तूर चोरीला गेली. कांदा महागलाय म्हणून कांदा पण चोरून नेलाच विरुळात चोरट्यांनी घराबाहेर असलेले सीएफएल लाईटच चोरीन चक्रावूनच टाकल आहे.

अज्ञाताने घरापुढे लावलेले लाईट नेले. अगोदरच डोळ्यान दिसत नाही. त्यात घरात राहणारे दोघेही वयोवृद्ध दाम्पत्य आहे. चोरट्याने लाईटच नेला असे नाही चक्क होल्डर लाईट चोरून नेला. उधारीत आणलेला लाईट चोरीला गेला.या भुर्दंडामुळे आजीच्या रागाचा तोल गेला आणि चोरला शिवा देऊन मन शांत केल.

चोरट्याने काही एकाच घरातील लाईट नेले असे नाही. एकाच रात्री दहा ते 12 घराच्या अंगणातील लाईट चोरीला गेले. सीएफएल लाईट आणि त्याची किंमत शंभरीपार आहे. यामुळे एकाच रात्री अचानक चोरीला गेलेले लाईट हे एखाद्या तळीरामाणे नेले असावे. हे लाईट विकून दारू ढोसल्याची शक्यता असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. पण याबाबत गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. पुढे चालून हा प्रकार पुन्हा झाल्यास तक्रार देणार असा इशारा त्यांनी दिला.

चोरट्यांचा दारूसाठी जर हा उपद्रव असेल तरहा उपद्रव सर्वानाच धक्का देणारा आहे. आता रात्री लाईटही सुरक्षित राहणार नसेल तर चोरट्याच्या डोक्यात उजेड पडत नाही तोपर्यंत तरी घरापुढे अंधारच राहू द्यायला हरकत नाही. Body:.Conclusion:
Last Updated : Jan 24, 2020, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.