वर्धा - सेवाग्राम आश्रम हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. देशभरातून लोक येथे येऊन नतमस्तक होतात. सेवाग्राम राष्ट्रपिता महात्मा गांधींची देशाच्या स्वातंत्रकाळातील कर्मभूमी राहिलेले पावन स्थळ आहे. या आश्रमाचे अध्यक्षपदही तेवढेच प्रतिष्ठेचे समजले जाते. पण मागील दोन वर्षपासून सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे अध्यक्षपदावरून राजीनामा दिल्याचे टी आर एन प्रभू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षांचा राजीनामा अहिंसा, प्रेम आणि शांतीचा संदेश देणाऱ्या स्थळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा अंतर्गत कलहातून देण्यात आला. मागील दोन वर्षपासून सुरू झालेल्या वादाला लॉकडाऊनमध्ये विश्राम देण्यात आला. प्रभू यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे हा राजीनामा सर्व सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवभाई विद्रोही यांचा वाढता हस्तक्षेप, गांधी विरोधी असल्याचा बिनबुडाच्या आरोपांमुळे दिल्याचे ते सांगतात.
सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षांचा राजीनामा प्रभू गांधीविरोधी काम करत आहे. ते आरएसएस नीतीने वागत असल्याचा आरोप सर्व सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवभाई विद्रोही यांनी केला आहे. गांधी विरोधी काम करत असल्याचे म्हणत प्रभू यांना 18 मार्चला आश्रमाच्या अध्यक्षपदावरून हटवल्याचे सांगण्यात आले. यात सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान ही स्वतंत्र संस्था आहे. यात सर्व संघाच्या वतीने आश्रम अध्यक्ष निवड करण्याची पद्धत असली तरी काढून टाकण्याचे अधिकार नाहीत, असे प्रभू सांगतात. यामुळे माझी बाजू ऐकून न घेता हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. या विरोधात ते सर्वच स्तरावर लढा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे हा वाद या संस्थेचा कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरणार आहे.
वादाची ठिणगी केव्हा पडली -टी. आर. एन प्रभू हे अध्यक्षपदावर असताना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक सेवाग्राम आश्रमात करण्याचे नियोजन होते. यावेळी त्यांनी सेवाग्राम आश्रम परिसरात परवानगी नाकारली. यामुळे येथेच वादाला सुरुवात झाली. यावेळी कुठली दुसरी जागा नसल्याने आणि काँग्रेस कमिटीला येथेच बैठक घ्यायची असल्याने सर्व सेवा संघाने त्यांच्या कार्यालय परिसरात बैठकीला जागा उपलब्ध करून देण्यात आली. तेव्हापासून प्रभू यांच्यावर काँग्रेस विरोधी असल्याचा ठपका ठेवण्यात आला.
सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षांचा राजीनामा यानंतर हळूहळु हा वाद वाढत गेला आणि एकमेकांना पाण्यात पाहायला सुरवात झाली. यानंतर एका बैठकीत प्रभू यांनी सर्व सेवा संघाने एका राजकीय पक्षाला जागा देऊन काय संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रश्न विचारल्यानंतर हा वाद वाढला. यानंतर राष्ट्रीय सेवा दलाची परवानगी नाकारली. यासह देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी भेट दिली असता त्यावेळीं सर्व सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना येऊ नाही दिले, असा प्रचार करण्यात आला. विशेष यात परवानगी त्यांच्या सुरक्षेच्या एजन्सीने नाकारली असल्याचा खुलासा प्रभू यांनी केला. यासह अनेक बिनबुडाचे आरोप महादेव भाई विद्रोही यांनी केल्याने मनस्ताप झाला. यामुळे माझे म्हणणे ऐकून न घेतल्याने राजीनामा दिल्याचे प्रभु सांगतात.
सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षांचा राजीनामा सध्या लॉकडाऊन असल्याने मागील काही कालावधीपासून आश्रम आणि सर्व सेवा संघाची बैठक झालेली नाही. प्रभू यांनी दिलेल्या राजीनाम्यावर बैठकीत चर्चा होईल आणि त्यांनतर पुढील निर्णय होईल, अशी माहिती आश्रमाचे सचिव मुकुंद मस्के यांनी दिली. यामुळे हा वाद शांतीचा संदेश देणाऱ्या भूमीत अशांती निर्माण करणारा नसून सामंजस्याने सुटेल अशी आशा गांधीवादी करत आहेत.